एक्स्प्लोर
पाकिस्तानकडे क्षमता नसल्यास त्यांनी आमच्याकडे मदत मागावी, आम्ही दहशतवाद नष्ट करु : राजनाथ सिंह
हशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल, तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून या कामात त्यांना हवी ती मदत केली जाईल.असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला केले आहे.
लखनौ : दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल, तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून या कामात त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करु, असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला केले आहे. शनिवारी उत्तर प्रदेशमधील चंदौली येथे आयोजित एका कार्यक्रमात सिंह बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले की, "दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे, पाकिस्तानच्या धरतीवरील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा, यासाठी आमच्या सरकारने आणि पंतप्रधानांनी निर्णायक युद्ध करण्याची तयार केली आहे."
गृहमंत्र्यांनी सांगितले की, "जगभरातले बरेचसे देश दहशतवादाशी लढाई लढत आहेत. या सर्व देशांना दहशतवादापासून सुटका हवी आहे. भारताने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या कामात भारताला जगभरातील अनेक देशांकडून समर्थन मिळत आहे. या कामात जगभरताले अनेक देश भारताच्या पाठिशी उभे आहेत. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पावलं उचलली, तर भारत पाकिस्तानला सहकार्य करेल."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement