वायूसेनेचा 87 वा स्थापना दिन ; ताफ्यात येणार पहिले राफेल
दसऱ्याच्या मुहुर्तावर आज भारताला पहिले राफेल विमान मिळणार आहे. पहिले राफेल स्वीकारण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला. पहिले विमानासाठी दसरा आणि वायुदलाचा स्थापना दिन असा दुहेरी मुहुर्त साधला आहे.
पॅरिस : दसऱ्याच्या मुहुर्तावर आज भारताला पहिले राफेल विमान मिळणार आहे. पहिले राफेल स्वीकारण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला गेले आहेत. भारतीय परंपरेनुसार ते शस्त्रपूजनही करणार आहेत.फ्रान्सकडून येणाऱ्या 36 विमानांपैकी पहिले विमानासाठी दसरा आणि वायुदलाचा स्थापना दिन असा दुहेरी मुहुर्त साधला आहे. राजनाथ सिंह हे पुढील तीन दिवस फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.
राजनाथ सिंह गेली अनेक वर्षे दसऱ्याच्या मुहुर्तावर शस्त्रपूजा करतात. यावर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत पहिले राफेल विमान स्वीकारल्यानंतर पूजा करणार आहेत आणि त्यानंतर विमानातून अर्ध्या तासाची हवाई सफर करणार आहे. या प्रसंगी फ्रान्सच्या संरक्षण दलाच्या मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांची प्रमुख उपिस्थती असणार आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, आज भारताला पहिले राफेल विमान मिळणार आहे. भारतात राफेलसाठी सगळे उत्साहीत आहे.
भारताला 36 राफेल विमानांपैकी पहिले राफेल विमान औपचारिकपणे आज दिले जाणार असले तरी पहिल्या चार विमानांची तुकडी भारतात येण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.
भारताने 2016 साली फ्रान्ससोबत 58000 कोटी रूपयांचा 36 राफेल विमान खरेदीचा करार केला होता. राफेल विमानामुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार आहे. वायुसेनेचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे. परेडमध्ये पहिल्यांदाच महिला ब्रिगेड सहभागी होणार आहे.
राफेल विमानाची वैशिष्ट्ये
- राफेलचा सर्वाधिक वेग 2130 किमी/तास
- 24500 किलो वजन घेऊन उडण्याची क्षमता
- इंधन क्षमता 17000 किलो आहे.
- राफेल हे दोन इंजिनवाले लढाऊ विमान आहे. वायुसेनेची ही पहिली पसंद आहे.
- स्कैल्प मिसाइल रेंज 300 किमी
- एका मिनीटात 60000 हजार फूट उंचीवर जाते.