भारत-पाक युद्धामुळे देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार? इंडियन ऑईलने दिली महत्त्वाची माहिती
IND VS PAK: भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार किंवा इंधनटंचाई निर्माण होणार का? असे प्रश्न उपस्थित होत असताना इंडियन ऑईलने महत्त्वाची माहिती दिली आहे.

India Pakistan War Oil: भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात इंधनाची टंचाई होणार या भीतीने अनेकजण पेट्रोलपंपांच्या बाहेर रांगा लावतानाच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इंडियन ऑईल कंपनीनं इंधनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभरात इंधनाचा पुरेसा साठा केला आहे. त्यामुळे पेट्रोलटंचाईची कुठलीही शक्यता नाही, त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका असं आवाहन इंडियन ऑईलनं केलं आहे.
बुधवारी जम्मू, पंजाब, राजस्थान विशेषत: सीमावर्ती भागात झालेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, दोन्ही अणवस्त्रधारी देशांमधील परिस्थिती चिघळत असताना देशात पेट्रोलपंपांवर लांबच लांब रांगा लावलेल्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्याने इंडियन ऑईलकडून देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, पेट्रोल पंपावर रांगा लावू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी हे आवाहन केलं आहे.
देशातील इंधनसाठा सुरळीत
जनतेला शांत राहण्याचे आणि अनावश्यक घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. कंपनीला पुरवठा सुरळीत राखण्यास आणि सर्वांसाठी अखंड इंधन उपलब्धता राहण्यास मदत होईल. "शांत राहून आणि अनावश्यक गर्दी टाळून आम्हाला तुमची चांगली सेवा करण्यास मदत करा. यामुळे आमच्या पुरवठा लाईन्स अखंडपणे चालू राहतील आणि सर्वांना अखंड इंधन उपलब्धता सुनिश्चित होईल," असे X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
#IndianOil has ample fuel stocks across the country and our supply lines are operating smoothly.
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) May 9, 2025
There is no need for panic buying—fuel and LPG is readily available at all our outlets.
Help us serve you better by staying calm and avoiding unnecessary rush. This will keep our…
पॅनिक बाईंगला सुरुवात
बुधवारी, पंजाबच्या काही भागात, विशेषतः सीमावर्ती भागात झालेल्या मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आणि रहिवाशांनी इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी गर्दी केली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार भारत पाकिस्तानच्या वाढत्या संघर्षात इंधन विक्री तिप्पट झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा तसेच इंधनसाठा करून ठेवण्यासाठी पॅनिक बाईंगला नागरिकांनी सुरुवात झाल्याचे लक्षात येताच इंडियन ऑइल कंपनीने भारतात पुरेसा इंधनसाठा असून पेट्राेलपंपाबाहेर गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक संबंध कमालीचे बिघडले आहेत. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (एलओसी) उल्लंघन केले आहे आणि सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा केला आहे, ज्यामुळे किमान 16 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.























