भारत पाकिस्तान युद्धाला तोडं फुटलं, राजसथानच्या सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचं चोख प्रत्युत्तर
भारत आणि पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) अखेर तोंड फुटलं आहे. पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर या ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) अखेर तोंड फुटलं आहे. पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर या ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हे सगळे ड्रोन भारताने पाडले आहेत. अशातच पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर गोळीबार सुरु केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानचे हल्ल्याचे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत.
जम्मू काश्मीरच्या सीमा भागातही पाकिस्तानने हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रोनने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळे हल्ले भारताने परतवून लावले आहेत. तसेच राजस्थानच्या सीमेवर देखील पाकिस्तानकडून गोळीबार सुरु करण्यात आला आहे. या गोळीबाराला देखील भारताने चोख प्रत्युत्तर देखील दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोटमध्ये भारताने हल्ले केले आहेत. या सर्व शहरांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. या कारवाईमुळं पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.
भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं. पाकिस्तानने ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी जम्मू विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि जम्मूला लागून असलेला सीमावर्ती भाग आरएस पुरा यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले.
प्राथमिक माहितीनुसार, भारतीय सैन्याने दोन जेएफ 17 विमाने आणि 1 एफ 16 विमान पाडले आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचे नियंत्रण करत असलेले इगल AWACS विमानही भारताने पाडले आहे. याच विमानाच्या साहाय्याने ड्रोन हल्ल्याचे नियंत्रण केले जाते. मात्र, आता हा कंट्रोल युनिटच नष्ट झाल्याने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला विफल झाला आहे. हा पाकिस्तानसाठी खूप मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला फक्त दोन इगल AWACS विमाने आहेत. त्यापैकी एक विमान भारताने नष्ट करणे हे पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे.
महत्वाच्या बातम्या:























