Covid-19 R-Value : दिलासादायक बातमी...! आर व्हॅल्यू कमालीचा घटला, देशात कोरोनाचा वेग मंदावला!- काय आहे R-value
India Corona Update : जगभरात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना देशासाठी मात्र दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. देशातील कोरोनाचं संक्रमण वाढीचा वेग (R-value) हळूहळू कमी होत आहे.
India Corona Update : जगभरात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना देशासाठी मात्र दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. देशातील कोरोनाचं संक्रमण वाढीचा वेग हळूहळू कमी होत आहे. कोरोना संक्रमणाचा वेग दर्शवणारा 'आर-व्हॅल्यू' (R-value) सप्टेंबर महिन्यात कमी होऊन 0.92 झाला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हा आकडा एकच्या वर गेला होता.
आर व्हॅल्यू म्हणजे काय
आर व्हॅल्यू म्हणजे कोरोना व्हायरसचं संक्रमण किती वेगानं पसरतं याचं मापक आहे. आर व्हॅ्ल्यू म्हणजे रिप्रोडक्शन नंबर. हा नंबर एका संक्रमित व्यक्तिकडून सरासरी किती लोकं संक्रमित करतो हे सांगतो. आर व्हॅल्यू कमी होण्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. ही आर व्हॅल्यू जर सतत कमी होत असेल तर कोविडचा कहर हळू हळू कमी होत असल्याचं स्पष्ट आहे. जर ही व्हॅल्यू सतत कमी होत गेली तर आपण लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवू शकू असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
मुंबईसह या शहरांमध्ये आर व्हॅल्यू अधिक
देशातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये कोरोना अद्याप गेलेला नाही. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु अशा मुख्य शहरांमध्ये‘आर-व्हॅल्यू’ एक पेक्षा अधिक आहे. तर दिलासादायक गोष्ट म्हणजे नवी दिल्ली आणि पुण्यात ही व्हॅल्यू एकपेक्षा कमी आहे.
महाराष्ट्रालाही मोठा दिलासा, आर व्हॅल्यू एकपेक्षा कमी
चेन्नईच्या गणित विज्ञान संस्थेचे अधिकारी सीताभ्र सिन्हा यांनी सांगितलं की, भारतात आर व्हॅल्यू एकपेक्षा कमी आहे. यात केरळ आणि महाराष्ट्र जिथं कोरोनाचे सर्वाधिक पेशंट आहेत तिथंही ही व्हॅल्यू कमी आहे. अच्छी खबर यह है कि भारत में आर-वैल्यू एक से कम बना हुआ है. आकड्यांनुसार मुंबईत आर-व्हॅल्यू 1.09, चेन्नईमध्ये 1.11, कोलकातामध्ये 1.04 तर बंगळुरुमध्ये 1.06 इतकी व्हॅल्यू आहे.
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार सुरुच
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार सुरुच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशामध्ये 26,964 नव्या रुग्णांची भर पडली असून 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशात 34,167 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 26,115 रुग्णांची भर पडली होती. केरळमध्ये मंगळवारी 15,768 जणांना कोरोनाची लागण झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख 61 हजार 195 इतकी आहे.