(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Update : कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच, गेल्या 24 तासात 27 हजार नवे रुग्ण तर 383 जणांचा मृत्यू
India Coronavirus Updates : केरळमध्ये मंगळवारी 15,768 जणांना कोरोनाची लागण झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. काल अमेरिका, ब्रिटन आणि टर्कीमध्ये भारतापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार सुरुच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशामध्ये 26,964 नव्या रुग्णांची भर पडली असून 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशात 34,167 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 26,115 रुग्णांची भर पडली होती.
केरळमध्ये मंगळवारी 15,768 जणांना कोरोनाची लागण झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख 61 हजार 195 इतकी आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 70 रुग्णांचा मृत्यू
देशातील सध्याची कोरोना स्थिती :
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 35 लाख 31 हजार
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 27 लाख 83 हजार 741
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 01 हजार 989
- एकूण मृत्यू : चार लाख 45 हजार 768
- देशातील एकूण लसीकरण : 82 कोटी 65 लाख 15 हजार 754 डोस
गेल्या सात दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
- 15 सप्टेंबर : 30,570 रुग्ण
- 16 सप्टेंबर : 34,403 रुग्ण
- 17 सप्टेंबर : 35,662 रुग्ण
- 18 सप्टेंबर : 30,773 रुग्ण
- 19 सप्टेंबर : 30,256 रुग्ण
- 20 सप्टेंबर : 26,115 रुग्ण
- 21 सप्टेंबर : 26,964 रुग्ण
राज्यातील स्थिती
राज्यात काल 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 44 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. राज्यात काल 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. कोरोना डबलिंग रेट 1177 दिवसांवर गेला आहे. 24 तासात एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Mumbai Corona : मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर; पुढचे 15 दिवस महत्वाचे