एक्स्प्लोर

India Coronavirus Updates : देशात सक्रिय रुग्णसंख्येत वाढ, 24 तासांत 28,326 रुग्णांची नोंद, 260 जणांचा मृत्यू

India Coronavirus Updates : देशात कोरोना प्रादुर्भावात काहीशी घट झाली असली तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत 28,326  नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 28,326  नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 260 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 26,032 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील कोरोनाची परिस्थिती 

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 36 लाख 52 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 2 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. एकूण 3 लाख 3 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 

देशातील सध्याची कोरोना स्थिती : 

कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 36 लाख 52 हजार 745
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 29 लाख 02 हजार 351
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 3 हजार 476
एकूण मृत्यू : चार लाख 46 हजार 918
देशातील एकूण लसीकरण : 85 कोटी 60 लाख 81 हजार 527 डोस

केरळात 24 तासांत 6671 नवे रुग्ण, 120 रुग्णांचा मृत्यू 

केरळात शनिवारी कोरोनाच्या 16671 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर येथे एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 46,13,964 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 24,248 वर पोहोचला आहे. 

राज्यात काल (शनिवारी) 3,723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 58 जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल (शनिवारी) 3,723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 276  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 60  हजार 735  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के आहे. 

राज्यात काल (शनिवारी) 58 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 416  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (06), नंदूरबार (3),  धुळे (1), जालना (30), परभणी (67), हिंगोली (18), नांदेड (6),   अमरावती (97), अकोला (28), वाशिम (07), बुलढाणा (15), यवतमाळ (05), नागपूर (142),  वर्धा (5), भंडारा (4), गोंदिया (7), चंद्रपूर (77),   गडचिरोली (18 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात सध्या 37 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,59,120 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,483  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 79, 92, 010 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,41,119 (11.28 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4676 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1195 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget