एक्स्प्लोर

Indo-China Dispute | भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा झटापट

सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु असतानाच पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिण भागात भारत-चीन सैन्यामध्ये झटापट झाली.

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं.

याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झडापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे.

दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

प्रेस इन्फर्मेशन ब्‍यूरोच्या पत्रकानुसार, भारतीय सैन्याने चीनला घुसखोरी करु दिलेली नाही. भारताने या परिसरातील सुरक्षा आणखी वाढवली आहे. झटापटीनंतरही चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावरील फ्लॅग मीटिंग सुरु आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवरील ही दुसरी मोठी घटना आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : 'शेतकऱ्यांच्या कांद्यावर तोडगा काढावा, बाकीच्या कांद्यांवर...; छगन भुजबळांनी सुहास कांदेंना डिवचलं
'शेतकऱ्यांच्या कांद्यावर तोडगा काढावा, बाकीच्या कांद्यांवर...; छगन भुजबळांनी सुहास कांदेंना डिवचलं
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुस्लिम धार्जिणी पार्टी म्हणजे उ.बा.ठा, फडणवीसांचा हल्लाबोलDevendra Fadnavis on Nashik : नाशिकच्या जागेवर नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सांगितली INSIDE STORYDevendra Fadnavis : बीडमधील सभेला अनुपस्थित का?  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : 'शेतकऱ्यांच्या कांद्यावर तोडगा काढावा, बाकीच्या कांद्यांवर...; छगन भुजबळांनी सुहास कांदेंना डिवचलं
'शेतकऱ्यांच्या कांद्यावर तोडगा काढावा, बाकीच्या कांद्यांवर...; छगन भुजबळांनी सुहास कांदेंना डिवचलं
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई सुरू
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
संजिव गोयंका अन् राहुलमध्ये काय चर्चा झाली, लखनौच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
Embed widget