(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 04 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
एकनाथ शिंदे हेच महायुती सरकारचे नेते, माझा व्हिजनमध्ये फडणवीसांची ग्वाही, तर पवार शत्रू नाहीत, राजकीय विरोधक, फडणवीसांचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंकडून अल्पसंख्याक समाजासाठी पायघड्या, ठाकरे गट सर्वात मोठा मुस्लीमधार्जिणा, माझा व्हिजनमध्ये फडणवीसांची टीका
मविआचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, माझा व्हिजनमध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, ती बैठक केवळ गप्पांसाठी होती, राऊतांचा पलटवार
बेकायदेशीर जमाव गोळा केल्याप्रकरणी पुणे लोकसभेेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांविरोधात गुन्हा दाखल.. मतदानाच्या आदल्या दिवशी पोलीस स्टेशनबाहेर केलं होतं ठिय्या आंदोलन
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४, पेट्रोल पंप मालक आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, तर शेजारील पोलीस वसाहतीमधल्या इमारतींना तडे
पेट्रोल पंपचालक भावेश भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदमांकडून शेअर, तर सरकार आमचे, पालिकाही आमचीच, ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या
घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेंने विधानसभा निवडणूक लढवल्याचं समोर, २००९ मधील प्रतिज्ञापत्र एबीपी माझाच्या हाती, तर भिंडे कुटुुंबासह फरार झाल्याचा सोमय्यांचा आरोप
मनोज जरांगेंची पुन्हा उपोषणाची हाक, मराठा आरक्षणासाठी ४ जूनपासून करणार उपोषण
महाराष्ट्रात १० जूनला होणाऱ्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुका पुढे ढकलल्या, शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान मोदींचं प्रमुख नेत्यांसह शक्तिप्रदर्शन, अर्ज दाखल करण्यापूर्वी गंगापूजन आणि कालभैरवाची आरती
राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर..शिरुर तालुक्यात तीन एकरवरील केळीची बाग भुईसपाट..तर भंडाऱ्यात लाखो रुपयांची मिरची भिजली