Devendra Fadnavis : बीडमधील सभेला अनुपस्थित का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण ABP Majha
मुंबई: शरद पवारांसोबत राहून आपलं अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे समजल्यानंतर अजित पवार हे आमच्यासोबत आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. मुंबईमध्ये आता मराठी मतदार हे भाजपच्या सोबत असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. 'एबीपी माझा'च्या माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते.
काही ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण
देवेद्र फडणवीस म्हणाले की, "विरोधी आघाडीकडून लोकांमध्ये भय निर्माण केलं जातंय. सुरूवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार असं भय निर्माण केलं गेलं, नंतर इतर समाजामध्येही भय निर्माण केलं गेलं. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही. मराठवाड्यातील आठ पैकी सात ठिकाणी सभा घेतल्या. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही. महाराष्ट्रात समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणं हे दुर्दैवी आहे."