Kartiki Gaikwad Pregnancy News : 'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Kartiki Gaikwad Pregnancy News : कार्तिकी-रोनितच्या घरी इवलुशा पावलांनी छोटा पाहुणा आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्तिकीने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
Kartiki Gaikwad Pregnancy News : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) आणि तिचा पती रोनित पिसे हे आईबाबा झाले आहे. कार्तिकी-रोनितच्या घरी इवलुशा पावलांनी छोटा पाहुणा आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्तिकीने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. कार्तिकीने सोशल मीडियावरुन याबाबतची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. कार्तिकीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी कार्तिकीच्या डोहाळ जेवणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर कार्तिकीने आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिले होते. त्यानंतर कार्तिकी आई कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज कार्तिकीने आपण आई झाल्याची बातमी चाहत्यांनी दिली.
कार्तिकीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत म्हटले की, आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. आम्हाला नवीन प्रेम सापडले असून हा क्षण खरंच व्यक्त करता येत नाही अशी भावना कार्तिकीने व्यक्त केली.
कार्तिकीने 2020 मध्ये रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर चार वर्षांनी कार्तिकी-रोनित आईबाबा झाले आहेत.
'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. कार्तिकीचं 'घागर घेऊन' हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
कार्तिकीचे डोहाळे जेवण, दिसला खास अंदाज
कार्तिकीचे खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळे जेवण करण्यात आले. डोहाळे जेवणासाठी कार्तिकीनं हिरवी कलरची साडी नेसली होती. चेहऱ्यावर दिसून येत असलेल्या ग्लोमुळे कार्तिकीचे सौंदर्य आणखीच खुलून आलं होते.
View this post on Instagram
कार्तिकीच्या डोहाळ जेवणात ती आणि तिचा नवरा रोहित ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती तर रोहित शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने घातले होते.