एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोकलाम वाद, तोडगा निघाला पण चीनची खुमखुमी कायम
भारत आणि चीननं डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केला. मात्र, भारताचा हा दावा चुकीचा असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात येतं आहे.
बिजिंग : डोकलाम मुद्यावर भारतानं समजुतीनं तोडगा काढण्याची तयारी दाखवल्यानंतरही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत आणि चीननं डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केला. मात्र, भारताचा हा दावा चुकीचा असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात येतं आहे.
भारताच्या व्यूहरचनेचा विजय, डोकलामप्रश्नी मोठं यश
भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या डोकलाम वादावर, दोन्ही देशांनी आपलं सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या व्यूहरचनेचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात होतं. मात्र, चीनच्या सैन्याकडून डोकलाममध्ये गस्त घालण्याचे काम सुरूच राहिल,’असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे चीनमध्ये लवकरच ब्रिक्स देशांची परिषद होणार आहे. त्याआधी डोकलाम वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
दरम्यान काही दिवसांआधी डोकलाम आणि पँगाँग भागात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं, वाद चांगलाच वाढला होता. तसंच चीनच्या प्रसारमाध्यमाकडून वारंवार दर्पोक्त्या दिल्या जात होत्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. यानंतर या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली.
त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.
‘डोकलाम’ भारत-चीन-भूतानचं ट्रायजंक्शन
सध्या सिक्किम कॉरिडॉरमध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.
भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे.
संबंधित बातम्या
डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
युद्धासाठी तयार राहा, चीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश
आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती
भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया
चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी
G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र
चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर
सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा
…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी
हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement