एक्स्प्लोर
Advertisement
मोदी सरकारमधील 78पैकी 72 मंत्री कोट्यधीश
मुंबई: नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाची संख्या 78 झाली. यापैकी 72 मंत्री कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्मने मंत्र्यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या तपशीलाच्या आधारे ही माहिती दिली आहे.
नव्या मंत्रिमंडळातील सर्वात जास्त श्रीमंत मंत्री एम.जे. अकबर आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 49.90 कोटी आहे. तर त्यानंतर पीपी चौधरी यांचा क्रमांक आहे. त्यांच्यी संपत्ती 35.25 कोटीची आहे. तर विजय गोयल यांची संपत्ती 29.97 कोटी इतकी संपत्ती आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांची संपत्ती 30 कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अरुण जेटली, हरसिमरत कौर बादलस जयंत सिन्हा, मनेका गांधी आणि महेश शर्मा यांचा समावेश आहे.
या सर्वांच्या यादीत अनिल दवे यांची संपत्ती सर्वात कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची संपत्ती 60.97 लाख रुपये आहे.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 9 महिला मंत्री आहेत. त्यातील 33 वर्षीय अनुप्रिया पटेल सर्वात तरुण मंत्री आहे.
शिक्षणच्या बाबतीत विचार केल्यास 14 मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता 12 उत्तीर्ण आहे. तर 63 मंत्री पदवीधर आणि उच्च विद्याविभूषीत आहेत.
या नव्या मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांनी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी तीन मंत्र्यांवर हत्या, धार्मिक दंगली, तसेच निवडणुत हिंसाचार असे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण
Advertisement