Weather Update : दिल्ली-उत्तर प्रदेशात हलक्या सरीचा पाऊस तर, उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी; वाचा हवामान विभागाचा अंदाज
IMD Weather Update : हवामान विभागानुसार, आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दिल्ली उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
IMD Weather Update : देशाच्या विविध भागांत जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसतोय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी (24 ऑगस्ट) राजधानी दिल्लीत हलका पाऊस अपेक्षित आहे. तर, 25 ऑगस्ट रोजी वातावरण चांगले असेल. आज दिल्लीचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 23 ऑगस्ट रोजी दिल्लीत दिवसभर पाऊस सुरूच होता, त्यामुळे वातावरण आल्हाददायक राहिल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. काल (23 ऑगस्ट) रोजी दिल्लीचे कमाल तापमान 29.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
उत्तर प्रदेशातही पाऊस सुरूच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या सरी तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, शुक्रवार 25 ऑगस्टपासून हवामानात बदल होऊ शकतो.
— RWFC New Delhi (@RWFC_ND) August 23, 2023
उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांची अडचण झाली आहे. राज्यात 25 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याशिवाय 24 ऑगस्ट रोजी उधमसिंह नगर आणि चमोली जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 12 वीच्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवार 24 ऑगस्टला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वजण सतर्क आहेत.
Forecast/warning for Uttarakhand issued on 22.08.2023 pic.twitter.com/OHFKYkwsVa
— Meteorological Centre Dehradun (@mcdehradun) August 22, 2023
28 ऑगस्टपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
15 ऑगस्टपासून मान्सूनचे पुनरागमन झाल्याने मध्य प्रदेशात पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात हलका ते मध्यम सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 28 ऑगस्टपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज राजस्थानमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, भरतपूर, धौलपूर, दौसा, करौली आणि अलवर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मॉन्सूनच्या हालचालींची नोंद होण्याची शक्यता आहे.
याशिवाय मान्सूनची ट्रफ रेषा पुन्हा हिमालयाच्या दिशेने सरकल्याने राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. हरियाणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तेलंगणा, मराठवाडा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, ओरिसा, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :