एक्स्प्लोर
Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवरील रिट्रीट सोहळा रद्द, आयफा सोहळाही पुढे ढकलला
देशात पसरणारा कोरोना व्हायरस पाहता खबदारीचा उपाय म्हणून अनेक महत्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा आणि दिल्लीतील नेमबाजी विश्वचषकासह अनेक मोठे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत, तर काही रद्द करण्यात आलेत.
नवी दिल्ली : चीनसह जगभरात खळबळ माजवणारा कोरोना व्हायरस आता भारतातही फोफावताना दिसतोय. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. याचे परिणाम आता सर्वच क्षेत्रात जाणवू लागलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला आहे. तर दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक आणि भोपाळमधला आयफा सोहळा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीच सलमान खानच्या एका चित्रपटाचे शुटींगही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्लीत आणखी एकाला कोरोनाची बाधा झालीय. हा रुग्ण दिल्लीच्या उत्तम नगरचा रहिवासी आहे. नुकताच हा रुग्ण थायलंड आणि मलेशिया इथून भारतात परतला आहे. तर कोरोनाचा वाढता धोका बघता दिल्लीत होणारी नेमबाजीची विश्वचषक स्पर्धा पुढं ढकलण्यात आलीय. तर भोपाळमधे होणारा आयफा चित्रपट पुस्कार सोहळही पुढे ढकललाय.
ब्रिटनचा कोरोना संशयित पर्यटक गोमेकॉत दाखल
वाघाअटारी बॉर्डरवरचा रिट्रीट सोहळा उद्यापासून बंद
कोरोना व्हायरसच्या खबरदारीसाठी वाघाअटारी बॉर्डरवरचा रिट्रीट सोहळा उद्यापासून बंद करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव हा वाढू नये यासाठी ही काळजी घेतली जात असल्याची माहिती अमृतसर के डीसी शिवदुलार सिंह ढिल्लोंनी दिली आहे. तर, भारतीय फिल्म अकादमीने गुरुवारी 21व्या नेक्सा आयफा ऍवॉर्डस् 2020 च्या 11 श्रेणीतील नामांकनाची घोषणा केली. सर्वाधिक 14 नामांकने 'गलीबॉय' या चित्रपटाला मिळाले असून त्याखालोखाल 'कबीर सिंह' 8, 'आर्टिकल 15' ला 7 नामांकने आहेत. 27 ते 29 मार्चदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयफा सोहळा रंगणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी सरकार सज्ज, नागरिकांनी भीती बाळगू नये : मुख्यमंत्री
सलमान खानच्या चित्रपटाचे शुटींग पुढे ढकललं
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे' यावर्षी ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांच्या भेटीस येणार होता. राधे चित्रपटाची शूटींग थायलँडमध्ये होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे चित्रपटाची शूटींग रद्द करण्यात आली आहे. थायलँडमध्ये देखील कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण आढळलेत. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन देखील रद्द करण्यात आल्याचं समजतयं.
सैलानी बाबांची यात्रा अखेर रद्द
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची नारळाच्या सर्वात मोठ्या होळीसाठी प्रसिद्ध असलेली सैलानी बाबांची यात्रा अखेर रद्द करण्यात आलीय. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आलीय. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातून हजारोंच्या संख्येनं भाविक येथे येता असतात. त्यामुळे सैलानी यात्रेत सध्या आलेल्या भाविकांना परत जाण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना जाण्या-येण्यासाठी परिवहन व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.
Coronavirus | जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 29 वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement