एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यघटनेवर विश्वास, केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंचा यू-टर्न
अनंतकुमार हेगडेंच्या वक्तव्यामुळे काल राज्यसभेत मोठा गदारोळ झाला होता आणि विरोधकांनी हेगडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली : राज्यघटनेबाबतच्या वक्तव्यावरुन केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडेंनी यू-टर्न घेतला आहे. राज्यघटनेवर माझा संपूर्ण विश्वास असून, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे हेगडेंनी स्पष्टीकरण दिले.
अनंतकुमार हेगडेंच्या वक्तव्यामुळे काल राज्यसभेत मोठा गदारोळ झाला होता आणि विरोधकांनी हेगडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
“माझ्या वक्तव्यावरुन संसदेत गदारोळ सुरु आहे. त्यासंदर्भात मी विश्वासाने सांगेन की, राज्यघटना आणि संसदेवर माझा सर्वतोपरी विश्वास आहे. मी कुठल्याही स्थितीत संसदेच्या विरोधात बोलू शकत नाही.”, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
https://twitter.com/ANI/status/946251657297272833
अनंतकुमार हेगडे काय म्हणाले होते?
आपले आई-वडील कोण आहेत, हे धर्मनिरपेक्ष आणि विचारवंतांना माहित नसतं, असे अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील एका कार्यक्रामत म्हटले होते. शिवाय, स्वत:ला धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगणे म्हणजे नवीन परंपरा झाली आहे.
कुणी स्वत:ला मुस्लिम, इसाई, लिंगायत, ब्राम्हण किंवा हिंदू असे गर्वाने म्हणवून घेत असले, तर मला आनंदच होईल, असेही ते म्हणाले होते.
“जे लोक आपलं मूळ विसरतात, ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात. त्यांची स्वत:ची अशी काहीच ओळख नसते. मात्र ते विचारवंत असतात.”, असे म्हणताना हेगडे पुढे म्हणाले, “राज्यघटनेचा सन्मान करतो. मात्र हे सारं आगामी काळात बदलेल. आम्ही त्याचसाठी सत्तेत आहोत आणि त्याचसाठी सत्तेत आलो आहोत.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement