एक्स्प्लोर
ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होईल, पण माझी इच्छा नाही : हेमा मालिनी
‘मी ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी तशी इच्छा नाही,’ असं वक्तव्य भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केलं आहे.
![ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होईल, पण माझी इच्छा नाही : हेमा मालिनी I can become chief minister in a minute, says Hema Malini ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होईल, पण माझी इच्छा नाही : हेमा मालिनी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/01/28233826/hema-malini-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जयपुर : ‘मी ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी तशी इच्छा नाही,’ असं वक्तव्य भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यास माझ्यावर अनेक बंधने येतील, त्यामुळे आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असं हेमा मालिनींनी म्हटलं.
हेमा मालिनी या उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. ‘तुम्हाला संधी मिळाल्यास मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?’ असा प्रश्न त्यांना राजस्थानमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना हेमा मालिनींनी हे उत्तर दिलं आहे. हेमा मालिनींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
‘अभिनय क्षेत्रातील कामामुळेच मला आजही ओळखलं जातं आणि मी खासदार म्हणून निवडून येण्यातही याच प्रसिद्धीचा मोठा वाटा आहे,’ असं हेमा मालिनी यांनी म्हटलं.
हेमा मालिनी यांनी आपल्या राजकारणातील प्रवासाबद्दलही भाष्य केलं. ‘खासदार होण्याआधीही मी पक्षासाठी काम केलं आहे. आता खासदार झाल्यावर मला लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली. गेल्या चार वर्षांमध्ये रस्त्यांपासून इतर अनेक बाबतींत विकासाची कामं मी केली आहेत,’ असं त्या म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)