एक्स्प्लोर

N Convention Centre, Nagarjuna : नागार्जुनच्या तब्बल 6.69 एकरातील आलिशान कन्व्हेन्शन सेंटरवर महापालिकेचा बुलडोझर! नेमकं घडलं तरी काय?

N Convention Centre, Nagarjuna : थुम्मीकुंटा तलाव 29 एकरांवर पसरलेला आहे. नागार्जुनने या जागेजवळ एन कन्व्हेन्शन सेंटर बांधले होते. एन. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकूण तीन हॉल होते.

N Convention Centre, Nagarjuna : तेलगू स्टार नागार्जुनचे हैदराबादमधील (Hyderabad) बेकायदेशीर एन कन्व्हेन्शन सेंटर (N Convention Centre) शनिवारी 24 ऑगस्ट रोजी बुलडोझरने पाडण्यात आले. रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळील माधापूर येथील हायटेक सिटीजवळ त्यांनी हे केंद्र बांधले होते. तलावाच्या जमिनीवर हे केंद्र बेकायदेशीरपणे बांधल्याचा आरोप अभिनेत्यावर होता. हैदराबाद आपत्ती निवारण आणि मालमत्ता संरक्षण एजन्सी (HYDRA) टीमने कन्व्हेन्शन सेंटर जमीनदोस्त केले. दुसरीकडे या कारवाईवर नागार्जुनने (ollywood actor Nagarjuna) नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'न्यायालयाने पाडण्याचा निर्णय दिला असता, तर मी स्वतः तो पाडले असते. अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या कारवाईवर न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी आशा आहे.

नागार्जुन म्हणाला, या कृतीने दु:ख झाले

या कारवाईवर नागार्जुन यांनी (ollywood actor Nagarjuna on N Convention Centre) नाराजी व्यक्त केली. आम्ही अवैध बांधकाम केलेले नाही. ही जागा भाडेतत्त्वावर आहे. तलावातील एक इंचही जमीन वापरली गेली नाही. या केंद्राशी संबंधित सर्व तक्रारींवर स्थगिती आदेश काढण्यात आला. आज ती चुकीच्या माहितीच्या आधारे तोडली गेली आहे. केंद्र पाडण्यापूर्वी आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नाही.

कन्व्हेन्शन सेंटर 6.69 एकरवर बांधले होते

हे कन्व्हेन्शन सेंटर 6.69 एकरवर बांधण्यात आले आहे. थुम्मीकुंटा तलावाच्या 3.30-3.40 एकर जागेवर अतिक्रमण करून ते बांधण्यात आले. हैदराबादच्या भास्कर रेड्डी यांच्यासह अनेक तक्रारदारांनी HYDRA कडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हे केंद्र 29 एकरांवर पसरलेल्या थुम्मीकुंटा तलावावर बांधले गेले.

थुम्मीकुंटा तलाव 29 एकरांवर पसरलेला आहे. नागार्जुनने या जागेजवळ एन कन्व्हेन्शन सेंटर बांधले होते. एन. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकूण तीन हॉल होते. हे मोठ्या कार्यक्रमांसाठी वापरले जात होते. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक राजकीय पक्ष, मेळावे, विवाहसोहळे पार पडले आहेत. गेल्या वर्षी, टॉलिवूड अभिनेता आणि चिरंजीवीचा पुतण्या वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या लग्नाचे रिसेप्शन 5 नोव्हेंबर रोजी एन. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाले होते. 

नागार्जुनचे 100 हून अधिक चित्रपट 

64 वर्षीय नागार्जुन यांनी 100 हून अधिक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. विक्रम (1986) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. बॉलीवूडमधील आपल्या प्रवासाची सुरुवात शिवा या चित्रपटातून केली. 2012 मध्ये फोर्ब्सच्या भारतातील टॉप 100 लोकांच्या यादीत नागार्जुन 56 व्या आणि 2013 मध्ये 61 व्या क्रमांकावर होते. नागार्जुन यांची एकूण संपत्ती 950 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 9 कोटी रुपये घेतो. त्याच वेळी, तो एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2 कोटी रुपये घेतो. टीव्ही शोसाठी प्रति एपिसोड फी 5 कोटी रुपये आहे. नागार्जुन आपल्या कुटुंबासह हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत जवळपास 42 कोटी रुपये आहे.

आलिशान गाड्यांचा शौकीन

नागार्जुनकडे 1974 मॉडेल पोर्श 911 टर्बो, डॅटसन 240Z सारख्या कार आणि होंडा सीबीआर फायरब्लेडसारख्या सुपरबाइक आहेत. नागार्जुनच्या गॅरेजमध्ये लक्झरी कार्सचा संग्रह आहे, ज्यामध्ये BMW 7 सिरीज (रु. 1.7 कोटी), Audi A7 (रु. 90.5 लाख), BMW M6 (रु. 1.76 कोटी), पोर्श केयेन (रु. 2 कोटी) सारख्या कारचा समावेश आहे. नागार्जुनने अलीकडेच हैदराबादच्या वारंगल महामार्गावरील चेंगिनचेरला फॉरेस्ट ब्लॉकमधील 1080 एकर जंगल दत्तक घेतले आहे. त्याच्या देखभालीसाठी 2 कोटी रुपयेही दिले आहेत.

हैदराबादच्या सर्वात पॉश भागात 22 एकरचा फिल्म स्टुडिओ

अभिनेता असण्यासोबतच नागार्जुन एक चित्रपट निर्माता आणि उद्योगपती देखील आहे. 1976 मध्ये त्यांच्या वडिलांनी अन्नपूर्णा स्टुडिओ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. आता नागार्जुन आणि त्याचा भाऊ व्यंकट हे त्याचे मालक आहेत. हैदराबादमधील पॉश एरिया असलेल्या बंजारा हिल्समधील 22 एकरच्या या स्टुडिओमध्ये विविध प्रकारचे काम केले जाते. या स्टुडिओची किंमत अंदाजे 300 कोटी रुपये आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget