एक्स्प्लोर

Naga Chaitanya Sobhita Engagement Samanta : नागा चैतन्यच्या साखरपु्ड्यात समंथाची हजेरी, शेअर केला शोभिता धुलिपालासोबतचा फोटो

Samanta Shares Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement Photos : निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या साखरपुड्याचे फोटो नागा चैतन्यचे वडील, सुपरस्टार नागार्जुन यांनी शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या साखरपुड्याला समंथानेदेखील हजेरी लावली होती.

Samanta Shares Naga Chaitanya Sobhita Engagement Photos :  दाक्षिणात्य स्टार अभिनेता नागा चैतन्य ( Naga Chaitanya) आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला ( Sobhita Dhulipala) यांचा 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला शोभिता आणि नागा यांचे कुटुंबीय तसेच जवळचे मित्रही उपस्थित होते. हा कार्यक्रम नागार्जुनच्या हैदराबादच्या घरात पार पडला. निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या साखरपुड्याचे फोटो नागा चैतन्यचे वडील, सुपरस्टार नागार्जुन यांनी शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या साखरपुड्याला समंथानेदेखील हजेरी लावली होती. समंथा ही या सोहळ्यात नागा चैतन्यची मेहुणी म्हणून उपस्थित होती. 

ही समंथा म्हणजे नागा चैतन्यची पूर्वाश्रमीची पत्नी नसून शोभिताची बहीण आहे. शोभिताची बहीण म्हणजेच नागा चैतन्यची मेहुणी समंथा धुलिपाला हिने साखरपुड्यातील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची बहीण शोभितासोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये नागा आणि शोभिताचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.

सामंथा धुलिपालाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, पहिल्या फोटोमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे दोघेही कुटुंबासोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना समंथाने , “2022 पासून अनंतापर्यंत कायमचे.” अशी कॅप्शन दिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Samanta Dhulipala (@dr.samantad)

समंथा धुलिपालाच्या या पोस्टच्या कॅप्शनमुळे  शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य 2022 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले. शोभिता आणि नागा यांच्या नात्याची चर्चा गेल्या वर्षी हैदराबादमध्ये दिसल्यानंतर सुरू झाली होती. या दोघांनीही नात्यांच्या चर्चेबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आता मात्र, त्यांनी साखरपुड्यासह त्यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. 

नागा चैतन्य आणि  शोभिताच्या लग्नाची घाई नाही...

नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेते नागार्जुन यांनी सांगितले की, आम्ही साखरपुडा केला कारण तो शुभ दिवस होता. लग्नाची घाई नाही. चैतन्य आणि शोभिता लग्नासाठी पूर्णपणे तयार होईपर्यंत काहीही होणार नाही. साखरपुड्याला शोभिताचे आई-वडील आणि बहीणही उपस्थित होते. त्याशिवाय माझी पत्नी अमलादेखील हजर होती असेही नागार्जुन यांनी सांगितले. 

2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा प्रभू झाले विभक्त

नागा चैतन्य आणि समंथा रुत प्रभूची भेट 'ये माया चेसवा' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांच्यातील मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने धून धडाक्यात लग्न केलं. पण, त्यांच नातं जास्त काळ टिकलं नाही. नाग चैतन्यने ऑक्टोबर 2021 मध्ये साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget