एक्स्प्लोर
इंजिनिअरिंग सीईटी तूर्तास 'होल्ड'वर!

नवी दिल्ली: देशभरातील इंजिनिअरिंगची सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात कॉमन एण्ट्रस एक्झाम (सीईटी) स्थगित करण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
सर्व राज्यांचं एकमत होत नाही तोवर इंजिनिअरिंग सीईटी 'होल्ड'वर ठेवण्यात आली आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एजुकेशन (AICTE)) येत्या शैक्षणिक वर्ष 2018 पासून देशभरात इंजिनिअरिंगसाठी एकच सीईटी होईल, अशी घोषणा मार्च महिन्यातच केली होती.
मात्र पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने त्याला विरोध केला आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय तूर्तास थांबवला आहे.
"देशभरात इंजिनिअरिंगची एकच प्रवेश परीक्षा असावी, याबाबत सर्व राज्यांचं एकमत होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सध्या हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे", असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
याप्रकरणी सर्व राज्यांशी चर्चा आणि सल्ला मसलत होणं आवश्यक आहे, असंही या अधिकाऱ्याने सांगिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
