एक्स्प्लोर
कानपूरजवळ हावडा-दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे 15 डबे घसरुन अपघात
हावड्याहून राजधानी दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्सप्रेसला रात्री बारा वाजून 51 मिनिटांच्या सुमारास कानपूरजवळ अपघात घडला.
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे जवळपास वीस प्रवासी जखमी झाले आहेत. धावत्या ट्रेनचे 15 डबे घसरुन झालेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.
हावड्याहून राजधानी दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्सप्रेसला रात्री बारा वाजून 51 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला. ट्रेनचे 15 डबे घसरले, तर चार डबे उलटले. अपघातानंतर अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
पूर्वा एक्सप्रेसचा एसी कोच बी-3 ला अपघाताचा मोठा फटका बसला. या कोचमधील अधिक प्रमाणात प्रवासी जखमी झाले.
मदतीसाठी एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
पूर्वा एक्सप्रेसची वेगमर्यादा प्रतितास 130 किलोमीटर असून अपघातावेळी ट्रेन 127 किमी प्रतितास वेगाने धावत होती. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वे मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement