एक्स्प्लोर
Advertisement
देशभर होळीचा उत्साह, भारतीय जवानांकडून सप्तरंगांची उधळण
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अन्य नेते आणि कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली.
नवी दिल्ली : देशभरात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. भारत-पाकिस्तान सीमेवरही आज उत्साहाचं वातावरण आहे. महिनोनमहिने आपल्या घरापासून दूर असलेले भारतीय जवान होळीच्या रंगात न्हाऊन निघाले. शत्रूसोबत दोन हात करणारे जवान एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देत होते.
दुसरीकडे अनेक राजकीय नेतेही होळीच्या रंगात रंगले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अन्य नेते आणि कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली. दिल्लीत केंद्रीय नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही होळीचा आनंद लुटला. आपल्या कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना रंग लावत त्यांनी ढोलही वाजवला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. नरसिंहाची आरती झाल्यानंतर योगींनी फुलं आणि अभीरने होळी साजरी केली. तर आपचे नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी होळीचा सण साजरा करताना आपल्या शैलीत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
ऋषिकेशमधील होळीचं खास आकर्षण ठरला तालवाद्याचा बादशहा शिवमणी. शिवमणीच्या वादनावर उपस्थितांनी चांगलाच ठेका धरला.
होळीनिमित्त राजधानी दिल्लीत रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यात अनेक नर्तकींनी आपल्या बहारदार नृत्यानं कार्यक्रमाची रंगत वाढवली.
गोव्यातही आज शिमगोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. स्थानिकांबरोबरच इथं पर्यटनासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांनीही धुलिवंदनाचा आनंद लुटला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement