एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयएएस टॉपर कपलचं लग्न 'लव्ह जिहाद', हिंदू महासभा आक्रमक
नवी दिल्ली : आयएएस टॉपर टीना दाबी आणि अतहर आमीर-उल शफी खान यांच्या ठरलेल्या लग्नात मोडता घालण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदू महासभेने टीनाच्या पालकांना पत्र लिहून हे लग्न म्हणजे 'लव्ह जिहाद' असल्याचा दावा केला आहे.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय सचिव मुन्ना कुमार शर्मा यांनी हे पत्र लिहिल्याची माहिती 'जनता का रिपोर्टर'मधील एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. आधी अतहरची घरवापसी करा किंवा दोघांच्या लग्नाचा पुनर्विचार करा, असं या पत्रात सुचवल्याचं सांगितलं जातं. गेल्याच आठवड्यात टीना आणि अतहर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या वृत्ताने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली आलेली टीना आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. "दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तारीख अद्याप निश्चित नाही. दोघे लवकरच साखरपुडा करणार आहोत." असं टीना दाबी म्हणाली होती.
'ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी आमची भेट झाली. पहिल्याच नजरेत आमचं प्रेम झालं, असं टीना दाबीने सांगितलं होतं. अतहर फारच चांगला माणूस आहे, असंही ती म्हणाली.
टीना दाबी ही दलित समाजातील असून अतहर काश्मीरी मुसलमान आहे. अतहर हा काश्मीरमधील छोट्या गावातून आलेला आहे. तर टीनाचं बालपण दिल्लीतच गेलं आहे. टीनाने अतहरसोबतचे तिचे काही फेसबुकवर पोस्ट केले आहेत. त्यानंतर तिने टीकेलाही निमंत्रण दिलं.
"आमच्या संबंधाबाबत अनेक लोक चर्चा करत आहेत, ते ऐकून विचित्र वाटलं. पण आम्हाला कसलीही चिंता नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. मी, आमीर आणि आमचे पालक या निर्णयाने खुश आहेत. एक स्वतंत्र महिला म्हणून मला माझी निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे." असं टीनाने म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
केवळ अभ्यासच नव्हे, तर यशासाठी हेही महत्त्वाचं, UPSC टॉपर टीनाचा सल्ला
व्हायरल सत्य : आरक्षणाचा फायदा घेत टीना दाबी UPSC टॉपर?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement