एक्स्प्लोर

मोठी बातमी : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात!

Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा (Hemant Godse car accident) नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे.

Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा (Hemant Godse car accident) नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) बी डी मार्गावर अपघात झाल्याचं समोर आहे. या अपघातमध्ये हेमंत गोडसे (MP Hemant Godse)  थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालं आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेमंत गोडसे दिल्लीत येत होते. बी डी मार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही. या भीषण अपघातातून हेमंत गोडसे बचावले आहेत. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. 

हेमंत गोडसे यांच्या गाडीला जोरदार धडक - 

हेमंत गोडसे दिल्लीतील बी डी मार्गावरुन जात होते. ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवानं या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. 

राज्यसह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिकचं ढोल पथक या शिवजयंती सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतं. महाराष्ट्र सदनात या ढोलपथकाचं वादन असतं. याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात होते का? याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

कोण आहेत हेमंत गोडसे ?
हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून ते नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झाली. २००७ ते २०१२ या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी 'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 सालच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे पहिल्यांदा नाशिकचे खासदार झाले. तर  2019 साली खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच सरळ लढत झाली. यावेळी हेमंत गोडसे हे पुन्हा निवडून आले आहेत.

आणखी वाचा :

Raj Thackeray : मोठी बातमी! शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget