एचडीएफचे 100 ग्राहक रातोरात झाले श्रीमंत, खात्यात अचानक आले 13 कोटी रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण
HDFC BANK: तामिळनाडूमधील एचडीएफसी बँकेचे 100 ग्राहक रातोरात श्रीमंत झाले आहेत. रविवारी बँकेने अचानक या ग्राहकांच्या खात्यात 13-13 कोटी रुपये जमा केले आहेत.
HDFC BANK: तामिळनाडूमधील एचडीएफसी बँकेचे 100 ग्राहक रातोरात श्रीमंत झाले आहेत. रविवारी बँकेने अचानक या ग्राहकांच्या खात्यात 13-13 कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र ग्राहकांचा हा आनंद काही वेळेपुरताच मर्यादित राहिला. एचडीएफसी बँकेने केलेली ही मोठी चूक आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील टी. नगर एचडीएफसी बँकेच्या शाखेशी संबंधित 100 ग्राहकांना एक एसएमएस प्राप्त झाला होता. या मेसेजद्वारे बँकेने प्रत्येक ग्राहकाला सांगितले की, त्यांच्या खात्यात 13 कोटी रुपये जमा झाले आहेत. म्हणजे एकूण 1300 कोटी रुपयांचे मेसेज बँकेने पाठवले होते. एवढी मोठी रक्कम खात्यात येताच एका ग्राहकाला आश्चर्याचा धक्का बसला. या ग्राहकाला आपले खाते हॅक झाले आहे, अशी भीती वाटल्याने त्याने लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बँक शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यानंतर काही तांत्रिक बिघाडामुळे एसएमएस गेल्याचे त्यांनी सांगितले. शाखेत सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे ही समस्या उद्भवली. तथापि, ही समस्या चेन्नईतील फक्त त्याच एचडीएफसी बँकेच्या शाखेतील काही खात्यांपुरती मर्यादित होती.
याबाबत माहिती देताना बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, ''हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाले. कोणतेही हॅकिंग झाले नाही आणि 100 ग्राहकांच्या खात्यात 13 कोटी रुपये जमा झाले नाहीत. तांत्रिक बिघाडामुळे फक्त ग्राहकांना एसएमएस गेले. माहिती मिळताच आम्ही तातडीने या खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध लावले. यादरम्यान फक्त खात्यात पैसे जमा केले जाऊ शकते. जोपर्यंत या समस्येचे निराकरण होत नाही, तोपर्यंत हे निर्बंध उठवले जाणार नाहीत.'' दरम्यान, रविवारी 80 टक्के समस्या दूर झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला
- Crude Oil Price : इंधन दर वाढण्याची शक्यता; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले
- Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सकडून मागील वर्षात दर दिवशी सव्वा तीन कोटींचे दान