(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या रिलायन्सकडून मागील वर्षात दर दिवशी सव्वा तीन कोटींचे दान
Reliance CSR : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सीएसआर अंतर्गत मागील वर्षात मोठा खर्च केला.
Reliance CSR : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असणारे, भारतातील उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विविध सामाजिक कामांना भरभरून दान दिले असल्याचे समोर आले आहे. रिलायन्सने मागील आर्थिक वर्षात 1,184.93 कोटी रुपये सीएसआर फंडमधून (Corporate Social Responsibility) खर्च केले आहेत. कंपनीने कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ऑक्सिजन पुरवठा, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात हा निधी खर्च केला आहे.
रिलायन्सच्या अहवालात सीएसआर फंडच्या खर्चाबाबत माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सामाजिक जबाबदारीत पुढाकार, आरोग्य आणि समाजासाठी कल्याणकारी योजना या 2021-22 मध्ये कंपनीच्या अजेंड्यावर होते. मागील आर्थिक वर्षात कंपनीने फक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर देशात महासाथीत ओढावलेल्या आणीबाणीच्या प्रसंगात मोठा खर्च केला आहे.
या अहवालानुसार, 2021-22मध्ये रिलायन्सने गरजूंच्या मदतीसाठी सीएसआर उपक्रमांसाठी एकूण 1,184.93 कोटींचा खर्च केला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने सीएसआर निधी खर्च केला जातो.
मागील दोन वर्ष ही सेवेची असल्याचे रिलायन्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ष 2021 च्या सुरुवातीला अनेक अपेक्षा होत्या. मात्र, महासाथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठं संकट उभे राहिले होते. या संकटाने देशासह जगावरही परिणाम झाला.
महासाथीच्या दरम्यान रिलायन्सने देशातील नागरिकांना आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे रिलायन्सने आपल्या अहवालात म्हटले. रिलायन्सने केलेले काम हे फक्त सीएसआर म्हणून नव्हते. तर, लोकांचे आयुष्य, त्यांची स्वप्ने आणि भविष्य वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: