Haryana Election Results 2024 : जिलेबीचा तुकडा मोडण्यापूर्वीच वारं फिरलं, हरियाणात काँग्रेसची 'वक्त बदल गए, जज्बात बदल गए'ची अवस्था
Haryana Election Results 2024 : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला काँग्रेसने कमालीची आघाडी घेतली होती. मात्र आता चित्र बदललं असून भाजप आघाडीवर आहे.
Haryana Assembly Election Results 2024 : हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर सध्या मतमोजणी सुरू आहे. निकालात सुरुवातीला काँग्रेसने (Congress) प्रचंड आघाडी घेतली होती. मात्र आता निकाल बदलत असल्याचे पाहायला मिळत असून भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा जल्लोष करणाऱ्या काँग्रेसची आता वक्त बदल गए और जज्बात बदल गए, अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. कालांतराने काँग्रेसची आघाडी मजबूत होत गेली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले. फोटो आणि सेल्फी काढण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांना हरियाणात विजयाची इतकी आशा होती की ते ढोल-ताशांच्या तालावर ही नाचले.तर जिलेबीसह लाडू वाटपदेखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
#WATCH | Delhi: Congress workers break into early celebrations outside the party office, ahead of the counting of votes for #HaryanaElections and #JammuKashmirAssemblyElection today. pic.twitter.com/WJdWzkMJjn
— ANI (@ANI) October 8, 2024
काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता
पण हरियाणा निवडणुकीचे ट्रेंड झपाट्याने बदलले. भाजप आणि काँग्रेसमध्ये हरियाणात चुरशीची लढत झाली. मात् आता भाजपने हरियाणामध्ये बहुमत मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता काँग्रेस कार्यालयाबाहेर भयाण शांतता पाहायला मिळत आहे.
#WATCH | Delhi: Congress worker Jagdish Sharma and other party workers distribute sweets outside Congress office as counting of votes for #HaryanaElections and #JammuKashmirAssemblyElection is underway. pic.twitter.com/eO5e4eJbBe
— ANI (@ANI) October 8, 2024
काय आहे सध्याची परिस्थिती?
दरम्यान, हरियाणा विधानसभा मतदारसंघात एकूण 90 जागा आहेत. सध्याच्या अंदाजानुसार भाजप एकूण 51 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणजे भाजपने बहुमताचा आकडा पार केलाय. तर काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे. लोक दलाला केवळ दोन जागा आणि इतर पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पार्टीला हरियाणामध्ये एकही जागे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अंतिम निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या