Haryana Elections Results 2024: हरियाणात भाजपची ऐतिहासिक हॅटट्रिक, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय; लोकसभेनंतर मोठा दिलासा
Haryana Elections Results 2024: हरियाणाचा खेळ संपलेला नाही, साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबा; भाजप माईंड गेम खेळतंय; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप
चंदीगढ: हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप, 34 मतदारसंघांमध्ये काँग्रेस, लोक दल 2 आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत (Haryana Elections Results 2024) सत्तास्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप (BJP) सहजपणे सत्ता स्थापन करेल.
भाजपने या निवडणुकीत विजय मिळवल्यास हरियाणात तिसऱ्यांदा त्यांची सत्ता येईल. हरियाणात आतापर्यंत एकदाही तिसऱ्यावेळी एकाच पक्षाचे सरकार निवडून आलेले नाही. त्यामुळे भाजपचा हरियाणातील विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. 1980 साली भाजपची स्थापन झाल्यानंतर पक्ष पहिल्यांदा हरियाणात मैदानात उतरला होता. 1982 साली हरियाणात भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. 1986 मध्ये भाजपने 16, 1996 मध्ये 11, 2000 मध्ये 6 आणि 2005 साली भाजपला अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला होता. तर 2014 साली भाजपने 33.3 टक्के मिळवत सर्वाधिक 47 जागा मिळवल्या होत्या. परंतु, यंदाच्या निवडणुकीत भाजप हा विक्रमही मोडू शकतो. सध्या भाजप तब्बल 51 जागांवर आघाडीवर आहे. सध्याचा ट्रेंड कायम राहिल्यास भाजपची ही हरियाणा विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी असेल.
लोकसभा निवडणुकीत भाजपला काहीसा फटका बसला होता. भाजपला स्वबळावर सत्तास्थापन न करता आल्याने पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले होते. मात्र, हरियाणातील विजयामुळे देशभरातील विशेषत: महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुणावणार आहे.
हरियाणा विधानसभा मतमोजणीचे चित्र कोणत्याही क्षणी बदलणार?
हरियाणात फिरोजपुरा झिरका मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सर्वाधिक मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसचे मम्मन खान तब्बल 75468 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या नसीम अहमद यांच्यावर मम्मन खान यांची आघाडी. आतापर्यंत 19 पैकी 13 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपचे 11 उमेदवार दीड हजारांपेक्षाही कमी मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे 7 उमेदवार दीड हजारांपेक्षा कमी मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे ३ उमेदवार दीड हजारांपेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहेत. तर सध्या एकूण 20 उमेदवार 3 हजारांपेक्षाही कमी मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते.
आणखी वाचा
काँग्रेसला मतं जास्त, पण भाजपापेक्षा जागा मात्र कमी, हरियाणात मतमोजणीत अजब खेळ; नेमकं काय घडतंय?