एक्स्प्लोर

Haryana Election Results 2024 : हरियाणात एक्झिट पोल्सच्या चाणक्यांना मतदारांचा गुलिगत धोका, भाजपची हवा कळलीच नाही, काँग्रेसवर लावलेला डाव फसला

Haryana Election Results 2024 : हरियाणातील आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार सर्व एक्झिट पोल अयशस्वी होताना दिसत आहेत. ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे.

नवी दिली : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Haryana Vidhan Sabha Election Result 2024) आता समोर येत आहेत. हरियाणातील आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार सर्व एक्झिट पोल (Exit Poll) अयशस्वी होताना दिसत आहेत. ट्रेंडमध्ये भाजपला (BJP) बहुमत मिळाले आहे. निकालाचा कल बदलला तर 2019 प्रमाणे राज्यातील एक्झिट पोल पुन्हा फोल ठरणार आहे.

ट्रेंडमध्ये भाजप 47 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर इतर 7 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी, बहुतेक एक्झिट पोल हरियाणात काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन दर्शवत होते. पोल ऑफ पोलमध्ये हरियाणात काँग्रेसला 55 तर भाजपला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

हरियाणात 2019 मध्येही चुकले होते एक्झिट पोलचे अंदाज

2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला 61 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता तर काही एक्झिट पोलने 75-80 जागा जिंकण्याचा अंदाजही वर्तवला होता. मात्र, निकाल एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. भाजपने 40 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला 31 जागा जिंकण्यात यश आले होते. भाजपच्या स्पष्ट बहुमताच्या एक्झिट पोलच्या अंदाजाच्या विरुद्ध निकाल 2019 साली लागल्याचे दिसून आले होते. सी व्होटरनेही भाजप 72 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, तो देखील चुकीचा ठरला होता. यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत देखील एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीतही चुकले होते एक्झिट पोलचे अंदाज

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) अनेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बहुमताने जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 361 ते 401 जागा मिळतील, असा अंदाज होता. तर भाजप स्वबळावर बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा जिंकेल, असाही अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, एक्झिट पोलचे निकाल चुकीचे ठरले होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 तर भाजपला 240 जागा मिळाल्या.

हरियाणात कोण सत्ता स्थापन करणार?

दरम्यान, सध्या हरियाणात काँग्रेस पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने मोठी मुसंडी घेतली असून भाजपाची 47 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस केवळ 36 जागांवर आघाडीवर आहे. मात्र निवडणुकीचा निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. हरियाणात कोण सत्ता स्थापन करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?

Haryana Elections Results 2024: भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर ExclusiveMarkadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Embed widget