एक्स्प्लोर

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस : हार्दिक पटेल

शेतकऱ्यांनी आंदोलन स्वत:च्या हातात घेतल्यानं सरकार अस्वस्थ आहे. त्यामुळे हा आक्रोश शांत करण्यासाठी आंदोलन संघाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप हार्दिक पटेलनं केला.

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा सनसनाटी आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत हार्दिकने हा आरोप केला. गेल्या तीन दिवसांपासून रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. काल हार्दिक पटेल अण्णांच्या भेटीसाठी जाणार होता. मात्र हार्दिकला व्यासपीठावर येऊ न देण्याची भूमिका अण्णांनी घेतली. त्यानंतर डिवचल्या गेलेल्या हार्दिक पटेलनं अण्णांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन स्वत:च्या हातात घेतल्यानं सरकार अस्वस्थ आहे. त्यामुळे हा आक्रोश शांत करण्यासाठी आंदोलन संघाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप हार्दिक पटेलनं केला. “काल मला जी माहिती मिळाली त्यानुसार अण्णा मला मंचावर येऊ देणार नव्हते. पाठीमागेच भेटणार होते. पण मुळात आमच्यासारख्या आंदोलकांना का दूर ठेवत आहेत? विरोधी पक्षांच्या आंदोलनातल्या सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग आताच इतकी टोकाची भूमिका का? तुम्ही जे मुद्दे उचलत आहात, त्याला विरोधी पक्षांचीही साथ असेल तर त्यांची इतकी अॅलर्जी का?”, असे प्रश्न हार्दिकने अण्णांना विचारले आहेत. तसेच, दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावर मला काल येऊ दिलं नाही, असा आरोपही हार्दिकने केला. “अण्णा म्हणतात 43 पत्रं लिहिली पंतप्रधानांना, उत्तर नाही दिलं म्हणून आंदोलनाची वेळ आली. मुळात इतका वेळ थांबायचंच कशाला? 5 पत्रांनंतरच का आंदोलनाला बसले नाहीत?”, असा सवालही हार्दिकने अण्णांना विचारला आहे. आरक्षणावरुनही अण्णावंर निशाणा "आमची आरक्षणाची मागणी घटनाविरोधी आहे, असं अण्णांना वाटत असेल तर आंबेडकरांचं संविधान मोठं की अण्णा मोठे? आंबेडकर आणि अण्णांची तुलना होत असेल, तर आय हेट अण्णा.", अशी टीका हार्दिकने अण्णांवर केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Embed widget