एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बाबा राम रहीचा आज निकाल, पंजाब-हरियाणात अलर्ट, रेल्वे रद्द

निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये बाबाते समर्थक जमा झाले आहेत. निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणाच्या सीमा सील केल्या आहे.

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज (25 ऑगस्ट) निकाल देणार आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर पंचकुला सीबीआय कोर्ट आज दुपारी अडीचच्या सुमारास निकाल जाहीर करणार आहे. राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये बाबाते समर्थक जमा झाले आहेत. निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणाच्या सीमा सील केल्या आहे. पंचकुलाला छावणीचं रुप सुनावणीआधी राम रहीमचे समर्थक प्रशासनाला खुलं आव्हान आणि धमकी देत आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्यांतील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 50 पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे. पंचकुला जिल्ह्यात सध्या दोन हजारांहून जास्त जवान सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. जिल्ह्याला छावणीचं स्वरुप आलं आहे. रस्त्यांवर बॅरिकेटिंग केली आहे. हरियाणाच्या 21 जिल्ह्यातील सुरक्षेत वाढ केली आहे. तर संपूर्ण राज्यात कलम 144 लावण्यात आलं आहे. पंजाब आणि हरियाणाकडे जाणाऱ्या 22 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. सुमारे 71 तास इथली रेल्वे सेवा बंद राहणार आहे. याशिवाय मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. क्रिकेट स्टेडियमचं तात्पुरत्या जेलमध्ये रुपांतर बाबासंदर्भात येणारा निकाल पाहता पंजाब आणि हरियाणा सरकारला हायअलर्ट देण्यात आला आहे. 25 ऑगस्टला निर्णय येणार असल्याने चंडीगडच्या सेक्टर 16 मधील क्रिकेट स्टेडियम तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची शक्यता आहे. राम रहीम बलात्कार निकाल: पंजाब-हरियाणात अलर्ट, 2 दिवस शाळा-कॉलेज बंद बाबा राम रहीमचं आवाहन यादरम्यान, गुरमीत राम रहीमने फेसबुक आणि ट्विटरद्वारे अनुयायींना शांततेचं आणि पंचकुला न जाण्याचं आवाहन केलं आहे. "मी कायम कायद्याचा आदर केला आहे. मला पाठदुखी आहे, तरीही मी कायद्याचं पालन करुन कोर्टात हजर राहणार. मला देवावर पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांनी शांतता राखा," असं बाबा राम रहीम म्हणाला. डेरा सच्चा सौदा आणि बाबा राम रहीमचे वाद 2001 – साध्वीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप 2002 – पत्रकार रामचंद्रच्या हत्येचा आरोप 2003 – डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांचं हत्याकांड 2007 – गुरु गोविंद सिंह यांच्या वस्त्रांवरुन शिखांसोबत वाद 2010 – डेराचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता होण्याचं प्रकरण 2012 – डेरा सच्चा सौदाच्या 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप 23 व्या वर्षात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख 1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देता. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. पाच कोटी भक्त, अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत साम्राज्य डेरा सच्चा सौदा आश्रम सुमारे 68 वर्षांपासून सुरु आहे. डेरा सच्चा सौदाचं साम्राज्य देश परदेशात पसरलं आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यूएईपर्यंत डेराचे आश्रम आणि अनुयायी आहेत. जगभरात डेराचे जवळपास पाच कोटी अनुयायी आहेत. ज्यापैकी सुमारे 25 लाख अनुयायी एकट्या हरियाणात आहेत. बाबाला सिनेमाचा शौक बाबाला चित्रपटांचाही शौक आहे. एक, दोन नाही तर पाच सिनेमात त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. एमएसजीपासून  जट्टू इंजिनिअरपर्यंतच्या त्याच्या सगळ्या चित्रपटांना यश मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तरTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSpecial Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget