Viral Video : तीन शेरांना कासव ठरले सव्वाशेर...अखेर ही शर्यतही कासवाने जिंकली
Viral Video : तीन शेरांना कासव पडले सव्वाशेर...अखेर ही शर्यतही कासवाने जिंकली. या व्हिडीओमध्ये तीन सिंहांना टक्कर देऊन एक कासव सुखरुप परत पाण्यात निघून जातंय
मुंबई : अतिआत्मविश्वास दाखवणाऱ्या सशाला हरवणाऱ्या कासवाची गोष्ट लहानपणापासून आपण ऐकत आलोय. ती शर्यत कासवाने जिंकली तशी सिंहांसोबतची जगण्या-मरण्याची शर्यतही कासवानेच जिंकल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील जुनागढचा आहे. या व्हिडीओमध्ये तीन सिंहांना टक्कर देऊन एक कासव सुखरुप परत पाण्यात निघून जातंय. हे सिंह त्या कासवाला पंजे मारण्याचा, त्याला खाण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना मात देणाऱ्या या कासवाची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरु झालीय. त्याचे झाले असे की, नदीच्या किनाऱ्यावर एका कासवाला सिंह पकडतात. त्यानंतर कासव आपले प्राण वाचवण्यासाठी सिंह आपले डोके कवचाखाली लपवतो. त्यानंतर सिंह कासवाला पलटण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना यश मिळत नाही. त्यानंतर तो सिंह जातो आणि दुसरा सिंह त्याठिकाणी येतो आणि कासवाला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी कासवासमोर प्रयत्न करून कंटाळला आणि तो देखील निघून गेला. त्यानंतर आलेल्या तिसरा सिंह कासवाला तोंडात घेऊन 12 ते 15 मिनिटांपर्यंत फिरत होता. पण तरी सिंहाला कासवाला पकडण्यात यश आले नाही. त्यानंतर सिंह त्याला सोडून जातो. काही वेळ शांत झाल्यानंतर कासव हळूहळू नदीकडे निघून जातो. हा व्हिडीओ गिर जंगलातील कमलेश्वर डेम येथील आहे.
शेर के शिकार की कोशिस ओर कछुए की जान बचाने के लिए सुजबुज ओर धीरज का ये वीडियो रेर वीडियो है। गिर में ऐसे वीडियो या दर्शय कभी कभी ही दिखने को मिलते है। गिर सासन के अधिकारी ने ही पूरी घटना केप्चर की।#Lions #Gujarat #turtle #wildlife #Video #justwow #alphanewsind pic.twitter.com/juHZbHJd18
— AlphaNews (@AlphaNews_IND) February 9, 2022
या व्हायरल व्हिडीओवर गिर अभयरण्याचे मुख्य अधिकारी डॉ. मोहन रामने सांगितले की, जेव्हा ते जंगलामध्ये राऊंडमध्ये निघाले होते. त्या दरम्यान तीन मेल सिंह इकडे तिकडे फिरताना दिसत होते. या दरम्यान एक सिंहाने एका कासवाला पकडले होते. हा कासव नदीच्या किनाऱ्यावर फिरत होते. त्यानंतर सिंह कासवाला खूप वेळ बघत होते. परंतु सिंहाला यश मिळाले नाही. परंतु कासावाला स्वत:चा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे.
हे ही वाचा :