एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातमधील दलित मारहाण प्रकरणाचे संसदेत पडसाद
अहमदाबाद : गुजरातच्या उनामध्ये दलितांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण संसदेत गाजलं आहे. मारहाणीविरोधात काल अहमदाबाद आणि राजकोटमध्ये बंद पाळण्यात आला. अनेक दलित संघटनांनी या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आलेली असून 4 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. उना भागात काही दलित तरुणांवर गायींचं कातडं काढून विकल्याचा आरोप झाला. त्यानंतर चार तरुणांना मारहाण झाली होती.
दरम्यान उना प्रकरणाचे लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले. यावर उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement