एक्स्प्लोर
काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर पाटीदार-काँग्रेस कार्यकर्ते भिडले!
हार्दिक पटेलच्या पादीटार अनामत आंदोलन समितीने काँग्रेसला पाठिंबा दिला असताना पाटीदारांना कमी उमेदवारी का असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला.

अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण यादीनंतर गुजरात काँग्रेस आणि पाटीदार नेत्यामध्ये जोरदार वाद झाला. 77 उमेदवारांच्या यादीत पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या केवळ दोन जणांनाच उमेदवारी दिल्याने पाटीदार कार्यकर्त्यांनी जोरदार वादवादी केली. अहमदाबादमध्ये गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोळंकी यांच्या घराबाहेर पाटीदारांनी गोंधळ घातला. हार्दिक पटेलच्या पादीटार अनामत आंदोलन समितीने काँग्रेसला पाठिंबा दिला असताना पाटीदारांना कमी उमेदवारी का असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला. चर्चेशिवाय काँग्रेसने पाटीदार उमेदवारांची घोषणा केली, असं पीएएएसचे संयोजक दिनेश बामणिया यांनी म्हटलं आहे. सोळंकी यांच्या घराबाहेर तोडफोड केल्यामुळे पोलिस आणि पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दुसरीकडे सूरतमध्येही पाटीदारांनी गोंधळ घातला. पाटीदार नेते काँग्रेसकडून 25 जागांची मागणी करत होते, पण काँग्रेस 11 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. काँग्रेसच्या या यादीत हार्दिक पटेलचे निकटवर्तीय ललित वसोया यांना धोराजी मतदारसंघातून आणि पीएएएस नेते निलेश कंबानी यांना कमरेज मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. तर, भाजपने 70 जणांच्या उमेदवारांच्या लिस्टमध्ये 15 पाटीदार नेत्यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने मात्र 77 पैकी फक्त 2 पाटीदार उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या यादीवरुन गुजरातमध्ये जोरदार गोंधळ झाला. पाहा व्हिडीओ
#WATCH Surat: Patidar Anamat Andolan Samiti workers clash with Congress workers over ticket distribution (earlier visuals) pic.twitter.com/uz5fx9oXIc
— ANI (@ANI) November 20, 2017
आणखी वाचा























