एक्स्प्लोर
177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर!
गुवाहाटीमध्ये आज जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत जीएसटी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
![177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर! GST Council lowered rates from 28 to 18 percent on 177 items 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/10144112/GST.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील जनतेला काहीसा दिलासा दिला आहे. 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. तर आता केवळ 50 महागड्या वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी लागेल.
गुवाहाटीमध्ये आज जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत जीएसटी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जीएसटी काऊंसिलने शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंना 28 टक्के स्लॅबमधून हटवलं आहे. त्यामुळे आता केवळ 50 लग्झरी प्रॉडक्टच 28 टक्के श्रेणीत राहतील.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे जीएसटी नेटवर्कच्या गटाचे प्रमुख आहेत. आतापर्यंत जीएसटी काऊन्सिलच्या 22 बैठका झाल्या आहेत. गुवाहाटीतील बैठक 23वी आहे.
28 टक्के जीएसटी
1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या जीएसटीचे सध्या 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 28% अशी एकूण सहा दर आहेत. यामध्ये सर्वात जास्त वाढ 28 टक्के आहे. 28 टक्के जीएसटी वाहनं, लग्झरी वस्तूंसह जवळपास 200 वस्तूंवर लावण्यात आला आहे.
तर दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर जीएसटी 28 टक्के असल्याने सामान्यांमध्ये नाराजी आहे. उदाहरणार्थ सिलिंग फॅनवर 28 टक्के जीएसटी आणि एअर कूलरवर 18 टक्के जीएसटी आहे. दुसरीकडे, शॅम्पू, टूथपेस्ट, शूज पॉलिश इत्यादी गोष्टींवरही 28 टक्के जीएसटी होता.
मात्र आजच्या निर्णयानंतर डिओ, शॅम्पू, शेव्हिंग क्रीम, कॉस्मेटिक्स यांच्यावरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात येणार आहे.
दरम्यान, जीएसटीच्या पहिल्या तीन महिन्यातच सरकारी तिजोरीत एकूण 2.78 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.
गुवाहाटीत GST काऊन्सिलची बैठक, मोठ्या बदलांची शक्यता
काय स्वस्त होणार
या निर्णयामुळए सॅनिटरी नॅपकीन, सूटकेस, वॉलपेपर्स, प्लायवूड, लेखन साहित्य, घड्याळ, खेळणी, आफ्टर शेव, डिओड्रंट, वॉशिंग पावडर, ग्रॅनाईट आणि मार्बल यांसारखी अनेक उत्पादनं आता 18 टक्क्यांच्या श्रेणीत येतात.
ही उत्पादनं स्वस्त नाहीत
तर रंग, सिमेंट, वॉशिंग मशिन, फ्रीज आणि तंबाखू यांसारख्या उत्पादनांना तेवढीच किंमत मोजावी लागेल, असं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)