एक्स्प्लोर

गोवा पर्यटकांसाठी खुलं; राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत पर्यटकांना मिळणार प्रवेश

देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या गोव्यात पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु, परदेशी नागरिकांना मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी माहिती दिली.

गोवा : कोरोनामुळे अख्खं जग जणू ठप्प झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. भारतातही कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा 5वा टप्पा सुरु असून देशात जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशातच देशात लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असून पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या गोव्यातही 2 जुलैपासून पर्यटन सुरु करण्यात आलं आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी संदर्भात माहिती दिली. असं असलं तरी विदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात येता येणार नाही, असंही ते म्हणाले.

एकदा करोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याचं निश्चित केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या 250 हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गोव्यातील पर्यटन सुरु करण्याबाबत बोलताना गोव्याचे पर्यंटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी सांगितले की, 'सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं बुकिंग अगोदरच करावं लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. तसेच प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या वतीने त्यांना क्वॉरंटाईन ठेवलं जाईल.' पुढे बोलताना आजगावकर म्हणाले की, 'ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे.'

दरम्यान, गोवा म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गोवा नेहमी पर्यटकांनी गजबजलेला पाहायला मिळतो. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. गोव्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात त्यानंतर पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. अशातच अनलॉकच्या टप्प्यात आता लॉकडाऊनमुळे सुन्न असलेली गोव्यातील पर्यटन स्थळं पुन्हा नियमांचं पालन करत पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

भारतात बॅननंतर टिकटॉकची मदर कंपनी ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता : ग्लोबल टाईम्स

प्रियंका गांधींना दिल्लीतला बंगला रिकामा करण्याची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' चीनी अॅप वरुन आपलं अकाऊंट केलं डिलिट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
Embed widget