(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' चीनी अॅप वरुन आपलं अकाऊंट केलं डिलिट
Weibo अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 पोस्ट केल्या होत्या. आता एक-एक करुन या पोस्ट हटवल्या जात आहेत. आतापर्यंत 113 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : भारत सरकारने चीनी मालाला भारतातून हद्दपार करण्यास हळूहळू सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतात वापर होत असलेल्या 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये भारतात कमी वेळेत जास्त लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. यासह Weibo अॅपचाही या 59 अॅप्समध्ये समावेश आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही Weibo वरुन आपलं अकाऊंट डिलिट केलं आहे. काही वर्षांआधी नरेंद्र मोदी यांनी Weibo अॅपवर आपलं अकाऊंट सुरु केलं होतं.
व्हीआयपी अकाऊंट्ससाठी Weibo अकाऊंट डिलिट करणे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हेच कारण आहे की अधिकृत प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही परवानगी मिळण्यास उशीर होत आहे. Weibo अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 पोस्ट केल्या होत्या. आता एक-एक करुन या पोस्ट हटवल्या जात आहेत. आतापर्यंत 113 पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.
For VIP accounts, Weibo has a more complex procedure to quit which is why the official process was initiated. For reasons best known to the Chinese, there was great delay in granting this basic permission: Sources https://t.co/aEtTLxIPFm
— ANI (@ANI) July 1, 2020
देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं आयटी अॅक्ट कलम 69 अ अंतर्गत 59 चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कोणते चीनी अॅप्स बॅन केले?
1. TikTok (टिकटॉक)
2. Shareit (शेअर इट)
3. Kwai (केवाई)
4. UC Browser (यूसी ब्राऊजर)
5. Baidu map (बायडू मॅप)
6. Shein (शीन)
7. Clash of Kings (क्लॅश ऑफ किंग्ज)
8. DU battery saver (डीयू बॅटरी सेव्हर)
9. Helo (हेलो)
10. Likee (लाईक)
11. YouCam makeup (यूकॅन मेकअप )
12. Mi Community (एमआय कम्युनिटी)
13. CM Browers (सीएम ब्राऊजर)
14. Virus Cleaner (व्हायरस क्लीनर)
15. APUS Browser (एपीयूएस ब्राऊजर)
16. ROMWE (रोमवी)
17. Club Factory (क्लब फॅक्टरी)
18. Newsdog (न्यूजडॉग)
19. Beutry Plus (ब्यूट्री प्लस)
20. WeChat (व्ही चॅट)
21. UC News (यूसी न्यूज)
22. QQ Mail (क्यू क्यू मेल)
23. Weibo (वीबो)
24. Xender (झेन्डर)
25. QQ Music (क्यू क्यू म्युझिक)
26. QQ Newsfeed (क्यू क्यू न्यूज फीड)
27. Bigo Live (बिगो लाईव्ह)
28. SelfieCity (सेल्फी सिटी)
29. Mail Master (मेल मास्टर)
30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi (पॅरालल स्पेस 31. एमआय व्हिडीओ कॉल- शाओमी)
32. WeSync (व्ही सिंक)
33. ES File Explorer (ईएस फाईल एक्सप्लोरर)
34. Viva Video – QU Video Inc (विवो व्हिडीओ - क्यूयू व्हिडीओ इंक)
35. Meitu (मीटू)
36. Vigo Video (विगो व्हिडीओ)
37. New Video Status (न्यू व्हिडीओ स्टेटस)
38. DU Recorder (डीयू रेकॉर्डर)
39. Vault- Hide (वॉल्ट हाईड)
40. Cache Cleaner DU App studio (कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ)
41. DU Cleaner (डीयू क्लीनर)
42. DU Browser (डीयू ब्राऊजर)
43. Hago Play With New Friends (हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स)
44. Cam Scanner (कॅम स्कॅनर)
45. Clean Master – Cheetah Mobile (क्लीन मास्टर- चीता मोबाईल)
46. Wonder Camera (वंडर कॅमेरा)
47. Photo Wonder (फोटो वंडर)
48. QQ Player (क्यू क्यू प्लेयर)
49. We Meet (वी मीट)
50. Sweet Selfie (स्वीट सेल्फी)
51. Baidu Translate (बायडू ट्रान्सलेट)
52. Vmate (व्हीमेट)
53. QQ International (क्यू क्यू इंटरनॅशनल)
54. QQ Security Center (क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर)
55. QQ Launcher (क्यूक्यू लॉन्चर)
56. U Video (यू व्हिडीओ)
57. V fly Status Video (व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ)
58. Mobile Legends (मोबाईल लिजेंण्ड्स)
59. DU Privacy (डीयू प्रायव्हसी)
India Banned 59 Chinese Apps | भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह कोणते 59 अॅप्स बॅन?