(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात बॅननंतर टिकटॉकची मदर कंपनी ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता : ग्लोबल टाईम्स
भारताने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर संबंधित कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: टिकटॉकला सर्वाधिक फटक बसला आहे.
नवी दिल्ली : चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने चीनच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. भारतातील 59 चीनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यामध्ये भारतातील लोकप्रिय असलेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. याबाबच चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटलं की यामुळे चीनचं मोठं नुकसान होणार आहे.
ग्लोबल टाईम्सने ट्वीट केलं की, भारताने 59 चीनी अॅप पूर्णपणे बॅन केले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चीनी इंटरनेट कंपनी ByteDance जी टिकटॉकची मदर कंपनी आहे, तिला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'या' चीनी अॅप वरुन आपलं अकाऊंट केलं डिलिट
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत भारत सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं आयटी अॅक्ट कलम 69 अ अंतर्गत हा निर्णय घेतला. त्याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चीनी अॅप्सची लिस्ट तयार केली होती आणि हे अॅप्स मोबाईलमधून हटवण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. चीन भारतीय डेटा हॅक करु शकतो हा या मागचा उद्देश होता.
कोणते चीनी अॅप्स बॅन केले?
1. TikTok (टिकटॉक)
2. Shareit (शेअर इट)
3. Kwai (केवाई)
4. UC Browser (यूसी ब्राऊजर)
5. Baidu map (बायडू मॅप)
6. Shein (शीन)
7. Clash of Kings (क्लॅश ऑफ किंग्ज)
8. DU battery saver (डीयू बॅटरी सेव्हर)
9. Helo (हेलो)
10. Likee (लाईक)
11. YouCam makeup (यूकॅन मेकअप )
12. Mi Community (एमआय कम्युनिटी)
13. CM Browers (सीएम ब्राऊजर)
14. Virus Cleaner (व्हायरस क्लीनर)
15. APUS Browser (एपीयूएस ब्राऊजर)
16. ROMWE (रोमवी)
17. Club Factory (क्लब फॅक्टरी)
18. Newsdog (न्यूजडॉग)
19. Beutry Plus (ब्यूट्री प्लस)
20. WeChat (व्ही चॅट)
21. UC News (यूसी न्यूज)
22. QQ Mail (क्यू क्यू मेल)
23. Weibo (वीबो)
24. Xender (झेन्डर)
25. QQ Music (क्यू क्यू म्युझिक)
26. QQ Newsfeed (क्यू क्यू न्यूज फीड)
27. Bigo Live (बिगो लाईव्ह)
28. SelfieCity (सेल्फी सिटी)
29. Mail Master (मेल मास्टर)
30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi (पॅरालल स्पेस 31. एमआय व्हिडीओ कॉल- शाओमी)
32. WeSync (व्ही सिंक)
33. ES File Explorer (ईएस फाईल एक्सप्लोरर)
34. Viva Video – QU Video Inc (विवो व्हिडीओ - क्यूयू व्हिडीओ इंक)
35. Meitu (मीटू)
36. Vigo Video (विगो व्हिडीओ)
37. New Video Status (न्यू व्हिडीओ स्टेटस)
38. DU Recorder (डीयू रेकॉर्डर)
39. Vault- Hide (वॉल्ट हाईड)
40. Cache Cleaner DU App studio (कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ)
41. DU Cleaner (डीयू क्लीनर)
42. DU Browser (डीयू ब्राऊजर)
43. Hago Play With New Friends (हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स)
44. Cam Scanner (कॅम स्कॅनर)
45. Clean Master – Cheetah Mobile (क्लीन मास्टर- चीता मोबाईल)
46. Wonder Camera (वंडर कॅमेरा)
47. Photo Wonder (फोटो वंडर)
48. QQ Player (क्यू क्यू प्लेयर)
49. We Meet (वी मीट)
50. Sweet Selfie (स्वीट सेल्फी)
51. Baidu Translate (बायडू ट्रान्सलेट)
52. Vmate (व्हीमेट)
53. QQ International (क्यू क्यू इंटरनॅशनल)
54. QQ Security Center (क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर)
55. QQ Launcher (क्यूक्यू लॉन्चर)
56. U Video (यू व्हिडीओ)
57. V fly Status Video (व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ)
58. Mobile Legends (मोबाईल लिजेंण्ड्स)
59. DU Privacy (डीयू प्रायव्हसी)
India Banned 59 Chinese Apps | भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह कोणते 59 अॅप्स बॅन?