एक्स्प्लोर
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे असलेली खाती समान ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरण खाती आहेत.

पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप करण्यात आले आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या मान्यतेनुसार मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे असलेली खाती समान ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरण खाती आहेत. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन आणि संग्रहालय खाती देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पक खाते देण्यात आले आहे. मनोहर (बाबू) आजगावकर यांच्याकडे पर्यटन, क्रीडा, छापखाना खाते सोपवण्यात आले आहे. इतर मंत्र्यांची खाती : रोहन खंवटे : महसूल, आयटी, रोजगार आणि मजूर खाते विश्वजीत राणे : आरोग्य, अन्न आणि औषध प्रशासन, हस्तकला प्रशिक्षण खाते गोविंद गावडे : अनुसूचित जमाती कल्याण, कला आणि संस्कृती, नागरी पुरवठा खाते माविन गुदिन्हो : पंचायत, शिष्टाचार, पशूसंवर्धन खाते जयेश साळगावकर : गृहनिर्माण, बंदर कप्तान, ग्रामीण विकास खाते विनोद पालयेकर : जलसंसाधन, मच्छिमार, वजन आणि माप खाते निलेश काब्राल : वीज, सौर ऊर्जा, कायदा आणि न्याय खाते मिलिंद नाईक : समाज कल्याण आणि नगर विकास खाते
आणखी वाचा























