एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तीन वेळा आमदार राहिलेले गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर पराभूत
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा आघात मानला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांना धूळ चारली. नोव्हेंबर 2014 मध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते.
गोव्यात 2012 मध्ये मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वात भाजपने बहुमतात सरकार स्थापन केलं होतं. मात्र पर्रिकरांना केंद्रात संरक्षणमंत्रिपद बहाल केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची देण्यात आली.
गोव्यात भाजप मजबूत करण्यात लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मोठा वाटा मानला जातो. मांद्रेम मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2002 मध्ये एमजीपीच्या रमाकांत यांना साडेसातशे मतांनी धूळ चारुन पार्सेकरांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 आणि 2012 मध्येही ते आमदारपदी निवडून आले होते.
गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. 4 मार्च 2017 ला गोव्यात मतदान झालं. कोणे एकेकाळी राजकीयदृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या गोव्यात 11 लाख 6 हजार मतदार आहेत. यावेळी 85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्यावेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांनी अधिक आहे.
संबंधित बातम्या :
GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement