एक्स्प्लोर
गोव्यात 83, तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान
पणजी : गोव्यासह पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं. गोव्यात 83 टक्के, तर पंजाबमध्ये 70 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. गोव्यात विक्रमी मतदानाची नोंद करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीला गोव्यात 81 टक्के मतदान झालं होतं.
गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदान झालं. 40 जागांसाठी तब्बल 251 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार आढळून आला नाही, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं.
पंजाबमध्ये काही ठिकाणी मतदानावेळी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. 117 जागांसाठी 1 हजार 145 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथे सत्ताधारी अकाली दल-भाजप, काँग्रेस आणि 'आप' यांच्यात तिहेरी लढाई होणार आहे. 11 मार्चला पंजाब आणि गोव्याचा निकाल लागणार आहे.
गोव्यात भाजपच्या अस्तित्वाची लढाई
सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला रामराम ठोकत त्यांचा गोवा सुरक्षा मंच हा नवीन पक्ष तयार केला आहे. त्यामुळं ही निवडणुक सत्ताधारी भाजपसाठी जास्त चुरशीची होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेनंही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजप एकाच वेळी दोन पक्षांना शह देण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची केंद्रीय संरक्षणमंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे गोव्यात यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गोव्यात 2012 साली भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. यावेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मनोहर पर्रिकर यांना भाजपनं समोर आणलं होतं. त्यामुळे मोदी आणि पर्रिकरांचा करिश्मा अजूनही कायम आहे का याकडे सर्वांचं लक्ष असेल. या निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी, आप, गोवा फॉरवर्ड, गोवा सुराज, गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार रिंगणात उभे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement