एक्स्प्लोर
Advertisement
इंजिनीअर व्हायचं नव्हतं, IIT-JEE पास होऊनही विद्यार्थिनीची आत्महत्या
कोटा : आयआयटी-जेईईमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊनही एका 17 वर्षीय विद्यार्थीने आत्महत्या केल्याची धक्कादायक राजस्थानमध्ये घटना घडली आहे. इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा नसल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कृती त्रिपाठी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. राजस्थानच्या कोटा शहरात इमारतीवरुन उडी मारुन तिने आयुष्य संपवलं. तिच्याकडून पाच पानांची सुसाईड नोट सापडली असून तिने त्यात आत्महत्येची कारणं लिहिल्याचं कोटा पोलिस अधीक्षक एस एस गोदाराने यांनी दिली आहे.
कृती ही मूळची गाझियाबादची राहणारी होती. मात्र ती तिच्या आई-वडिलांसोबत कोटामध्ये राहत होती. इथेच ती इंजिनीअरिंगची तयारी होती. कृतीने आत्महत्या केली तेव्हा तिचे वडील बाहेर गेले होते तर आई मागील काही दिवसांपासून गाझियाबादमध्ये होती, असंही पोलिसांनी पुढे सांगितलं. विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची कोटामधील ही वर्षांतील पाचवी घटना आहे.
दरम्यान, आईने माझा प्रवेश विज्ञान शाखेत केला. पण मला फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्ये जराही रस नव्हता, असं कृतीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. डिप्रेशन आणि इंजिनीअरिंगमध्ये रस नसणं, ही किर्तीच्या आत्महत्येची कारणं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आयआयटी-जेईईमध्ये खुल्या वर्गासाठी कट ऑफसाठी 100 गुणांची आवश्यकता होती. मात्र कृतीला तब्बल 144 गुण मिळाले होते, असंही पोलिस अधीक्षकांनी सांगितलं.
दरवर्षी देशभरात 1.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तयारी करतात. त्यासाठी विविध कोचिंग क्लासेसमध्ये नोंदणी करतात. दरम्यान, नापस होण्याच्या भीतीने मागील पाच वर्षात 56 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement