एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी 37 वर्षीय व्यापारी चौकशीसाठी ताब्यात
ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीला मोठं यश मिळालं आहे. या हत्येच्या घटनेला पाच महिन्याचा काळ लोटल्यानंतर 37 वर्षीय व्यापारी केटी नवीन कुमार याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीला मोठं यश मिळालं आहे. या हत्येच्या घटनेला पाच महिन्याचा काळ लोटल्यानंतर 37 वर्षीय व्यापारी केटी नवीन कुमारला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
केटी कुमारला 18 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आल्याचं, तपास यंत्रणांनी आज कोर्टात सांगितलं. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुरुवातीपासूनच केटी नवीन कुमारवर तपास यंत्रणांचा संशय होता.
आरोपीच्या मित्रांकडूनही याबाबतचे धागेदोरे मिळाले. त्यावरुन नवीन कुमारबाबतचा तपास यंत्रणांचा संशय बळावला. त्यावरुन कुमारला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी नवीन कुमारच्या पोलीस कोठडीत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे. कारण, त्याच्या चौकशीतून अजून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची पोलिसांना आशा आहे. त्यावरुन कोर्टानेही नवीन कुमारच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्याच घराबाहेर हत्या झाली होती. त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व साहित्यिकांनीही याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.Gauri Lankesh murder case: KT Naveen Kumar has been taken into custody by the Special Investigation Team (SIT) for questioning in Bengaluru, #Karnataka.
— ANI (@ANI) March 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement