एक्स्प्लोर
20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, नराधमांकडून व्हिडीओ व्हायरल
बलात्काराबाबत कुणालाही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी आरोपींनी पीडितेला दिली.

लखनौ : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन, व्हिडीओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. बोदवल बाजारातील एका कार्यक्रमातून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तरुणी घरी परतत होती. त्यावेळी पाच तरुणांनी तिला पकडले आणि ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. यावेळी नराधमांनी बलात्काराचा व्हिडीओही तयार केला. बलात्काराबाबत कुणालाही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी आरोपींनी पीडितेला दिली. पीडित तरुणीने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी व्हिडीओ व्हायरल केला आहे. पीडित तरुणीच्या आई आणि भावाने पोलिस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी अद्याप सापडले नाहीत, असे पोलिस सांगत आहेत. मात्र दोन आरोपींना अटक झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























