एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

G23 Congress : काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या G23 गटात कोणते नेते आहेत?

Congress : काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला एक प्रकारचे आव्हान G23 गटाकडून देण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. 

नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये सपाटून पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला पूर्ण वेळ सक्रिय अध्यक्ष द्यावा, संघटनात्मक पातळीवर नवे फेरबदल करण्यात यावेत अशी मागणी जी 23 गटाकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याचं दिसून येतंय.  

जी 23 गटाने या दोनच दिवसांपूर्वी सोनिया गांधींच्या उपस्थितीत एक बैठक घेतली होती. आजही या गटाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझादांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. पण या गटाकडून सातत्याने बैठका घेण्यात येत असून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला एक प्रकारचे आव्हान या गटाकडून देण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. 

जी 23 गटामध्ये कोण नेते आहेत?

  • गुलाम नबी आझाद
  • कपिल सिब्बल 
  • शशी थरुर
  • मनिष तिवारी
  • आनंद शर्मा
  • पीजे कुरियन
  • रेणूका चौधरी
  • मिलिंद देवरा
  • जतिन प्रसाद
  • भूपेंद्र सिंह हुडा
  • राजिंदर कौर भट्टल
  • एम विराप्पा मोईली
  • पृथ्वीराज चव्हाण
  • कौलसिंह ठाकुर
  • अजय सिंह
  • अरविंद सिंह लव्हली
  • राज बब्बर
  • कुलदीप शर्मा
  • संदीप दीक्षित 
  • योगेंद्र शास्त्री 
  • विवेक तंखा
  • मुकुल वासनिक

यातील अनेक नेत्यांनी केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव नेते आहेत जे जी 23 गटाचे सदस्य आहेत. याआधी मुकूल वासनिक यांचंही नाव या गटात घेतलं जात होतं. पण नंतर काँग्रेसच्या रचनेत मुकुल वासनिक यांना सामावून घेतलं गेलं. वासनिक यांना काँग्रेसच्या संघटन महासचिव पदाची जबाबदारी दिली गेली. शिवाय सोनिया गांधींना दैनंदिन कामकाजात मदत म्हणून जी तीन सदस्यीय सल्लागार समिती नेमली गेली त्यातही मुकूल वासनिक आहेत. त्यामुळे आता ते या बैठकांना हजर राहत नाहीत.

या 23 नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये काँग्रेसला सक्रिय अध्यक्षाची गरज असून त्याची नियुक्ती वेळ न दवडता करावी अशी मागणी केली होती. तसेच पक्षाला सातत्याने येत असलेल्या अपयशावर चर्चा करावी अशीही विनंती त्यांनी केली होती.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget