एक्स्प्लोर
दहावीच्या चार विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू
ग्रामीण पोलिसांना सावगाव येथील तळ्यात काही विद्यार्थी बुडल्याची माहिती मिळाली. तलावाच्या काठावर दुचाकी ,कपडे आणि चप्पलचे चार जोड आढळून आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सावगाव ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास प्रारंभ केला.
बेळगाव : येथील सावगाव तलावात पोहायला गेलेले चार शाळकरी विद्यार्थी बुडून मरण पावल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थी हे बेळगाव येथील गुड शेफर्ड शाळेचे विद्यार्थी असून ते दहावीत शिकत होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे ते दोन दुचाकी वाहनावरून पोहायला सावगाव येथील तलावात गेले होते.
गौतम कलघटगी, अमन सिंग, चेतन भांदुर्गे आणि साहिल बेनके अशी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. हे चौघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. सावगाव बेनकनहळ्ळी मार्गावर हा तलाव आहे.
ग्रामीण पोलिसांना सावगाव येथील तळ्यात काही विद्यार्थी बुडल्याची माहिती मिळाली. तलावाच्या काठावर दुचाकी ,कपडे आणि चप्पलचे चार जोड आढळून आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सावगाव ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. सायंकाळी चारही मृतदेह शोधण्यात यश मिळाले.
घटनास्थळी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी भेट दिली. तलावात पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्यामुळे ते बुडाले असावेत, त्यांना पोहायला येत होते की नाही, याची माहिती पोलीस घेत आहेत.
मुलांना पोहायला येत नसेल तर त्यांना पाण्याच्या ठिकाणी पालक आणि शिक्षकांनी पाठवू नये. पोहायला येत नसताना पोहायला गेल्यास जीवावर बेतू शकते या संबंधी पालक आणि शिक्षकांनी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस आयुक्त डी. सी.राजप्पा यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
जळगाव
Advertisement