एक्स्प्लोर

Unnao Rape Case | भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर दोषी

2017 मध्ये तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सिंह सेंगरवर आहे. त्यावेळी तरुणी अल्पवयीन होती.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपमधून निलंबित झालेला आमदार कुलदीप सिंह सेंगरला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. कुलदीप सेंगरविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने आज (16 डिसेंबर) आपला निर्णय सुनावला. 2017 च्या अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आमदार सेंगरला दोषी ठरवत, आरोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई केल्याने कोर्टाने फटकारही लगावली आहे. 19 डिसेंबर रोजी कुलदीप सिंह सेंगरच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. बंद खोलीत झालेल्या सुनावाणीत न्यायदंडाधिकारी धर्मेश शर्मा यांनी आधीच 16 डिसेंबर रोजी या प्रकरणात निकाल देणार असल्याचं सांगितलं होतं. 2017 मध्ये तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सिंह सेंगरवर आहे. त्यावेळी तरुणी अल्पवयीन होती. कोर्टाने सहआरोपी शशी सिंह विरोधातही आरोप निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशच्या बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सेंगरला या प्रकरणानंतर ऑगस्ट 2019 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. कोर्टाने 9 ऑगस्ट रोजी कुलदीप सेंगर आणि शशी सिंह विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गात गुन्ह्याची नोंद केली होती. तीस हजारी कोर्टाने सीबीआयलाही खडेबोल सुनावले. कोर्टाने म्हटलं आहे की, स्वत:ची आणि कुटुंबीयांचे प्राण वाचवण्यासाठी या प्रकरणाची उशिरा नोंद केली. आम्ही पीडितेच्या मनाची स्थिती समजू शकतो. गँगरेप प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक वर्ष का लावलं? पीडितेवर प्राणघातक हल्ला पीडित तरुणीच्या कारला 28 जुलै रोजी एका ट्रकने टक्कर मारली होती, ज्यात ती गंभीर जखमी झाली. दुर्घटनेत तरुणीचे दोन नातेवाईकांचाही मृत्यू झाला. षडयंत्र रचल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला होता. सुप्रीम कोर्टाने उन्नाव बलात्कार प्रकरणात दाखल सर्व पाच खटले 1  ऑगस्टला उत्तर प्रदेशातील लखनौच्या कोर्टातून दिल्लीतील कोर्टात स्थलांतरित केले होते. या खटल्याची नियमित सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. भय इथले संपत नाही | महिला सुरक्षेबाबत महाचर्चा | नागपूर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 May 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 20 May 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
Embed widget