एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ई-व्हिजावर भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना मोफत सिम, टॉकटाईम आणि डेटा
नवी दिल्ली : भारतात ई-व्हिजाच्या माध्यमातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना सरकारकडून आकर्षक सुविधा देण्यात येणार आहेत. ई-व्हिजाच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना यापुढे प्री-अक्टिवेटेड सिमकार्ड देण्यात येणार आहे. तसंच मोफत टॉकटाईम आणि डेटाही दिला जाणार आहे. यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही.
केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी या योजनेचं उद्धाटन केलं आहे. "बीएसएनएलच्या माध्यमातून परदेशी पाहुण्यांसाठी ही योजना आम्ही सुरु करत आहोत. सध्या ही सुविधा फक्त दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच उपलब्ध असेल. लवकरच ही सुविधा ई-व्हिजा सेवा देणाऱ्या सर्व 15 विमानतळांवर उपलब्ध करुन देण्यात येईल," अशी माहिती महेश शर्मा यांनी दिली.
दरम्यान श्रीलंका दौऱ्यावेळी आपल्याला असंच सिमकार्ड मिळालं असल्याचं महेश शर्मा यांनी सांगितलं. "या सुविधेमुळे परदेशी पाहुण्यांना सिमकार्ड मिळवण्यासाठीचा वेळ वाचवता येईल, तसंच या सिमकार्डच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संपर्क करणं सोपं जाणार आहे," असंही त्यांनी पुढे सांगितलं. मागच्या वर्षी जवळपास 10 लाख परदेशी पाहुण्यांनी ई-व्हिजा सुविधेचा फायदा घेतला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement