एक्स्प्लोर
Advertisement
पुलवामाचा बदला : ऐकले नाही म्हणून ठोकले, परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईला दुजोरा
या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असे गोखलेंनी सांगितले.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या कारवाईत अनेक अतिरेकी आणि जैशचे कमांडर ठार झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला हल्ला केला होता. पाकिस्तानला अतिरेक्याविरोधात पुरावे देऊन आणि वारंवार सांगूनही हात वर केले, असेही ते म्हणाले.
VIDEO | मिराजच्या हल्ल्यात तब्बल 200 अतिरेकी ठार | श्रीनगर | एबीपी माझा
जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता. अजहरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली. मात्र पाकने काही पावले उचलली नाहीत. काल रात्री भारतीय वायुदलाने बालकोटमधील जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. हा हल्ला ट्रेनिंग कॅम्पवरच केला. हा कॅम्प मौलाना युसूफ अझर चालवत होता. युसूफ अझर हा मसूद अझरचा नातेवाईक होता, असे गोखले म्हणाले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाले. सैन्याने सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. फक्त दहशतवाद्यांचे अड्डे मिराजच्या रडारवर होते, असे गोखलेंनी सांगितले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला जोरदार तडाखा
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. भारताच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. या एअर स्ट्राईकने भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईत भारताने आपल्या मिराज-2000 या विमानांचा वापर केला आहे. मिराज-2000 विमान शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या विमानांद्वारे एका तडाख्यात शत्रूंच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत करून टाकण्याची शक्ती असते.
संबंधित बातम्या
भारताचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला, जैशचे अड्डे उध्वस्त
भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता
पुलवामाचा बदला : पाकिस्तान घाबरला, पाक सरकारने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली
'मिराज' ने पाकिस्तानला हादरवले, याआधीही पाकला पाणी पाजले होते, काय आहे मिराज -2000 विमान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
आरोग्य
Advertisement