एक्स्प्लोर

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द

नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील. पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी काय कराल? www.abpmajha.in 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. आज एटीएम बंद : देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील. www.abpmajha.in चिंतेचं कारण नाही : पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. 10 नोव्हेंबरपासून ही मर्यादा वाढवण्यात येईल. ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील. रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील 72 तास म्हणजे 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे. दोन हजार रुपयांची नोट दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. एबीपी माझा वेब टीम प्रत्येक अपडेट - www.abpmajha.in वर 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 17 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडीABP Majha Headlines : 10 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
Free OTT Platforms List  : मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन  करण्याची गरज नाही; पाहा यादी
मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन करण्याची गरज नाही; पाहा यादी
Marathi Actor : लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
महायुतीच्या सभेसाठी आज दादरमधील वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या, पर्यायी मार्ग कोणते?
महायुतीच्या सभेसाठी आज दादरमधील वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या, पर्यायी मार्ग कोणते?
Embed widget